निवडणूक लोकशाही पद्धतीनेच व्हावी - ऍड. विजय पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

जळगाव - विधान परिषद व राज्यसभेत लोकप्रतिनिधी जो बुद्धिवान मतदारांमधून निवडून जाणे अपेक्षित असते. त्यामुळे त्या बुद्धिवान लोकप्रतिनिधीचा फायदा शासनाला निर्णय घेताना व्हावा, असे अभिप्रेत आहे. विधान परिषदेची जळगाव स्थानिक संस्था मतदारसंघातील निवडणूक गेल्या काही वर्षांपासून धनशक्तीच्या बळावर लढविली जात आहे. विधान परिषदेत जाणारा उमेदवार बुद्धिवान मतदारांनी निवडून दिलेला असावा, यासाठीच मी माझी उमेदवारी कायम ठेवली आहे. मला माघारीसाठी अनेकांनी विनंती केली. परंतु लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व भ्रष्टाचाराविरुद्ध मी उमेदवार आहे.

जळगाव - विधान परिषद व राज्यसभेत लोकप्रतिनिधी जो बुद्धिवान मतदारांमधून निवडून जाणे अपेक्षित असते. त्यामुळे त्या बुद्धिवान लोकप्रतिनिधीचा फायदा शासनाला निर्णय घेताना व्हावा, असे अभिप्रेत आहे. विधान परिषदेची जळगाव स्थानिक संस्था मतदारसंघातील निवडणूक गेल्या काही वर्षांपासून धनशक्तीच्या बळावर लढविली जात आहे. विधान परिषदेत जाणारा उमेदवार बुद्धिवान मतदारांनी निवडून दिलेला असावा, यासाठीच मी माझी उमेदवारी कायम ठेवली आहे. मला माघारीसाठी अनेकांनी विनंती केली. परंतु लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व भ्रष्टाचाराविरुद्ध मी उमेदवार आहे. माझ्यासोबत सहा अपक्ष उमेदवार असल्याची माहिती विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार ऍड. विजय पाटील यांनी आज सायंकाळी पत्रकारांना दिली.

अपक्ष उमेदवार शेख जावेद इक्‍बाल अ. रशीद, भडगावचे नगराध्यक्ष श्‍याम भोसले, सुरेश देवरे (नगरसेवक, पाचोरा) आदी याप्रसंगी उपस्थित होते.
ऍड. पाटील म्हणाले, की विधान परिषदेच्या निवडणुकीत धनशक्‍ती असलेला भांडवलदार उमेदवार उभा केला जातो. तो आर्थिक बळ निवडणुकीत वापरतो. यामुळे धनशक्ती असलेलाच उमेदवार आतापर्यंत विजयी होत आला आहे. आता मात्र भांडवलदाराविरुद्ध लोकशाही मार्गाने चालणारा उमेदवार, अशी ही निवडणूक रंगणार आहे. माझे मोठे बंधू जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही आजवर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा पुकारला आहे. मीही त्यात सहभागी आहे. या निवडणुकीत धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय होईल.

जलसंपदामंत्र्यांचा निषेध
नगरसेवक जावेद इक्‍बाल म्हणाले, की काही जणांनी निवडणुकीतून माघार न घेतल्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संबंधितांचा उल्लेख "चिल्लर नगरसेवक माघारीचे बाकी आहेत, असा केला.' त्यांच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो. आमदाराला निवडून आणताना नगरसेवकच मदत करतो. तेव्हाच आमदार निवडून येतो. नगरसेवकांबाबत त्यांनी "चिल्लर' असा शब्द उच्चारल्याने समस्त नगरसेवकांचा हा अपमान आहे. यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही नगरसेवक काय असतात, हेच त्यांना दाखवून देऊ. नगरसेवक सुरेश देवरे, नगराध्यक्ष श्‍याम भोसले यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.

Web Title: The election will be democratic method