निवडणुकीसाठी तिसरे मूल दत्तक देण्यापर्यंत तयारी 

विनोद बेदरकर- सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नाशिक - समाजशील प्राणी असलेल्या मानवी जीवनात कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुटुंब हेच सर्वस्व मानण्याची परंपरा असेही म्हटले जाते. पण राजकारण इतक्‍या टोकाला चालले आहे, की महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक तिसरे मूल कागदोपत्री दत्तक देत राजकारणाला प्राधान्य देण्याची मानसिकता करीत आहेत. अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही;, पण या निमित्ताने राजकारण इतके टोकाला चालले आहे, की त्यात कौटुंबिक मूल्यांची कशी वाट लागत आहे. याचा प्रत्यय अनुभवास येतो. 

महापालिकेच्या निवडणुकीत एकट्या नाशिक रोड विभागात किमान तीन प्रभागांत असे प्रयत्न सुरू आहेत. तिसरे मूल आहे, ज्या प्रभागात, उमेदवार राहत असलेल्या गल्लीत जगजाहीर आहे; पण त्या कुटुंबाच्या लेखी संबंधित मूल दत्तक म्हणून नोंद असणार आहे. जर राजकीय पक्षाने उमेदवारी दिलीच, तर तिसऱ्या मुलाला दत्तक दाखवत उमेदवारी करण्याची तयारी काही महाभागांनी चालविली आहे. नाशिक रोडला दोन पुरुष, तर महिला इच्छुकांनी तशी तयारी दर्शविल्याची चर्चा आहे. त्यावर राजकीय पक्षाकडून काय प्रतिसाद मिळतो, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. कदाचित राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळणार नाही, कदाचित मिळेलही; पण केवळ नगरसेवक होण्याच्या हौसेपायी मूल कागदोपत्री दत्तक दाखविण्याची मानसकिता हा मात्र यानिमित्ताने चर्चेचा विषय ठरणार आहे. 

दोन कुटुंबांचा घोळ 
जिथे रक्ताचे एका पत्नीपासून झालेले मूल दत्तक दाखविण्याची तयारी सुरू असेल तर दुसरी पत्नी, अंगवस्त्रासह अन्य कारणातून दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्यांची तऱ्हा तर त्याहून वेगळी. दोन विवाह, दोन कुटुंबांसह अंगवस्त्रापासून झालेल्या अपत्य असलेले काही जण इच्छुक आहेत. राजकीय पक्षांचे उमेदवारीसाठी उंबरे झिजवत आहेत. पक्षांनी  उमेदवारी दिलीच तर संबंधितानी पहिलं कुटुंबच कागदावर घेऊन दुसऱ्या कुटुंबांना कागदोपत्री न दाखविण्याची तयारी चालविली आहे. घरगुती मामला म्हणून राजकीय पक्षांना त्यात दखल घेण्याचे कारणच नाही. त्यामुळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्याविषयी बोलत नाही. कुणाला किती कुटुंब हेही राजकीय पक्षांनी तपासावे का? असा उलटा प्रश्‍न करीत नेतेमंडळींकडून या विषयावर मौन बाळगले जाते. अशा इच्छुकांच्या संख्येबाबत कुणी बोलत नाही. एकाहून अनेक पत्नींपासून अपत्य असलेल्या काही इच्छुकांची तयारी चालली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे एकाहून अधिक कुटुंबांचे संगोपन करणाऱ्या इच्छुकांच्या अपत्य लपविण्याची मानसिक तयारी हाही चर्चेचा विषय आहे.

Web Title: for the elections, the third child adopted supplying