मालेगावात निवडणूक यंत्रणा सज्ज 

मालेगावात निवडणूक यंत्रणा सज्ज 

मालेगाव : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर झाली असून, राजकीय पक्षांचे बॅनर्स, होर्डिंग, फलक तातडीने काढण्याचे आदेश दिले आहेत. आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघासाठी जवळपास एक हजार 900 कर्मचारी नियुक्त करणार आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मालेगाव बाह्यचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

मालेगाव बाह्यसाठी एक लाख ७८ हजार ५५४ पुरुष, तर एक लाख ६० हजार ५१४ स्त्रिया, तसेच तीन तृतीयपंथी, असे एकूण तीन लाख ३९ हजार ७१ एवढे मतदार आहेत. नवीन मतदारांची नावे नोंदली जात आहेत. निवडणुकीसाठी ३०८ मतदान केंद्र व आठ सहाय्यक केंद्र राहणार आहेत. मालेगाव बाह्यमध्ये शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव नववसाहत, द्याने, कलेक्‍टरपट्टा या शहरी भागासह ग्रामीण भागातील ७६ गावांचा समावेश आहे.

मतदार यादीतील तीन लाख २३ हजार ५१६ मतदारांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. हे प्रमाण ९६ टक्के आहे. मतदारसंघात अनिवासी भारतीय पाच, तर सैन्य दलातील ७०० मतदारांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, भूमिलेख उपअधीक्षक भगवान शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com