Dhule News : पापडनं पीठ घेरासाठे विद्युत चाटूना जुगाड..! विठ्ठल बोरसे यांचा प्रयोग

Electric mixer machine was created by Vitthal Borse for kneading flour dhule news
Electric mixer machine was created by Vitthal Borse for kneading flour dhule newsesakal

कापडणे (जि.धुळे) : खानदेशात हिवाळ्याचा उत्तरार्ध आणि उन्हाळ्याच्या पूर्वार्धात पापड, कुरडया, शेवाळ्या, वड्या बनविण्याचा हंगाम जोरात सुरू आहे. महिलांना हे पीठ घेरण्यासाठी अर्थात घुसळण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. (Electric mixer machine was created by Vitthal Borse for kneading flour dhule news)

काही महिला तर रोजंदारीने करवून घेतात. आता मात्र घंटो का काम मिनिटों में होत आहे. यासाठी येथील विठ्ठल बोरसे यांनी विद्युत रवीचा म्हणजे रईत छोटासा बदल करून खुबीने वापर करून घेतला आहे. त्यांच्या या जुगाडाला महिलांनी मोठी दाद दिली आहे.

खानदेशी महिलांचा पापड बनविण्याचा स्वतंत्र हंगाम आहे. हिवाळ्याचा उत्तरार्ध आणि उन्हाळ्याचा पूर्वार्ध या कालावधीत हा हंगाम सुरू असतो. पापड, वड्या, कुरडया, वड्या बनविण्यासाठी महिलांना मोठी मेहनत घ्यावी लागते.

नाचणी, ज्वारी, दादर आणि नागलीचे पापड बनविताना पातेल्यात पीठ घेरण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. चाटूच्या सहाय्याने घेरता घेरता चक्कर येण्याचीही अनेक उदाहरणे आहेत. या कामासाठी ताकद जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच पीठ घेरण्याची कलाही महत्त्वाची आहे अन्यथा पिठाच्या गुठळ्या होतात अन् पिठाचे तीन तेरा वाजतात.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Electric mixer machine was created by Vitthal Borse for kneading flour dhule news
Amruta Pawar : पक्षाने आदेश दिल्यास जिल्ह्यात कुठेही लढणार! : अमृता पवार

आता हे घेरण्याचे काम येथील विठ्ठल बोरसे यांनी अगदी सोपे केले आहे. त्यांनी यासाठी खास विद्युत रवी तयार केली आहे. त्यांनी वरण व ताक घुसळण्यासाठी तयार केलेल्या विद्युत रवीच्या पात्यात थोडा बदल केला आहे. यामुळे पीठ घेरणे अगदी सोपे झाले आहे. बोरसे यांनी घरचे पापड बनविताना हा प्रयोग केला अन् यशस्वी झाले.

आता त्यांच्या विद्युत चाटूला मोठी मागणी वाढली आहे. एका पातेल्यातील पीठ घेरण्यासाठी ते ५० रुपये मोजत आहेत. काही महिलाही विद्युत चाटू विकत घेण्यासाठी तसवीज करणार आहेत. मात्र त्याची किंमत तीन हजारांवर आहे. बोरसेही छोटा विद्युत चाटू तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Electric mixer machine was created by Vitthal Borse for kneading flour dhule news
Pimpalgaon Market Committee Election : माघारी अंतीच चित्र स्पष्ट होणार! पॅनलची घोषणा अद्यापही नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com