साक्रीत वाढीव वीजबिलांची समस्या कायम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

साक्री - शहरात काही महिन्यांपासून ग्राहकांना वाढीव वीजबिले दिली जात असल्याची समस्या कमी होण्याची अद्यापही चिन्हे नाहीत. दिवसागणिक या समस्येत वाढच होत आहे. 

साक्री - शहरात काही महिन्यांपासून ग्राहकांना वाढीव वीजबिले दिली जात असल्याची समस्या कमी होण्याची अद्यापही चिन्हे नाहीत. दिवसागणिक या समस्येत वाढच होत आहे. 

शहरातील छोटे बेकरी व्यावसायिक शेख इस्माईल शेख जमीर यांना सहा महिन्यांपासून वाढीव वीजबिलाचा भुर्दंड बसत आहे. त्यांना यापूर्वी सरासरी 2000 ते 2500 रुपयांपर्यंत वीजबिल येत असताना आता थेट 15 हजार, 12 हजार असे वीजबिल येत आहे. एप्रिल 2016 मध्ये त्यांना 12 हजार 432 रुपयांचे वीजबिल आले असताना त्यांनी कंपनीकडे तक्रार केली. यानंतर त्यांचे जुने मीटर तपासणीसाठी गेल्या मेमध्ये काढून नेण्यात आले. तरीही शेख यांना सप्टेंबरचे 15 हजारांचे बिल देण्यात आले. हे बिलही त्यांनी भरले. नोव्हेंबरमध्ये पुन्हा 12 हजार 850 रुपयांचे वीजबिल आले. याबाबत त्यांनी पुन्हा महावितरणकडे तक्रार केली असता "मीटर तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल मिळाल्यानंतर कळेल,' असे उत्तर देण्यात आले. अशातच वाढीव बिल न भरल्याने आता त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना दिली जात आहे. 

याबाबत महावितरणच्या कार्यालयात पाहणी केली असता तपासणीसाठी काढून नेलेले शेख यांचे मीटर अद्यापही कार्यालयातच पडून आहे. यावरून महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मानसिकता लक्षात येत आहे. या एकूणच गंभीर प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालावे, नागरिकांचा उद्रेक होण्यापूर्वीच कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. 

Web Title: electricity bills problem in sakri

टॅग्स