वीज ग्राहकांना 20 कोटींचा व्याज परतावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

वीजबिलापोटीच्या 315 कोटींच्या सुरक्षा ठेवीचा लेखाजोखा
नाशिक - वीज कंपनी वीजबिल, इंधन आकार, अधिभाराशिवाय वीजग्राहकांकडून सुरक्षा अनामत म्हणूनही स्वतंत्र ठेवरूपाने रक्कम घेत असते. नाशिक परिमंडळातील 315 कोटींच्या सुरक्षा ठेव रकमेपोटी वीज कंपनीने जिल्ह्यातील ग्राहकांना 20 कोटी 23 लाखांचा व्याजापोटी परतावा दिला.

वीज कंपनीकडून ग्राहकांना नियमित वीजबिलाशिवाय दरवर्षी सुरक्षा ठेव भरण्याचे स्वतंत्र बिल दिले जाते. सुरक्षा ठेवीपोटी साधारण एका महिन्याच्या बिलाची रक्कम कंपनी घेते. स्वीकारलेल्या सुरक्षा ठेवीवर साडेदहा टक्के व्याजाने ग्राहकांना परतावा करण्याचा नियम आहे. नाशिक परिमंडळात 2015-16 आर्थिक वर्षात 23 लाख 99 हजार 500 ग्राहकांच्या सुमारे 297 कोटी सुरक्षा ठेवीवर व्याजाच्या रूपाने 23 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील 13 लाख 98 हजार वीज ग्राहकांना 14 कोटी; तर 2016-17 आर्थिक वर्षातील 315 कोटींच्या सुरक्षा ठेवीवर 33 कोटी 21 लाख रुपये व्याज परतावा देताना जिल्ह्यातील ग्राहकांना 20 कोटी 23 लाख रुपये व्याजाचा परतावा वीजबिलातून देण्यात आला.

वीज ग्राहकांच्या बिलाचे पैसे वीज कंपनीत जमा होण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणून, कंपनी सुरक्षा ठेवीच्या स्वरूपात स्वतंत्रपणे जादा रक्कम स्वीकारते. वीज मंडळाचे कंपनीकरण झाल्यानंतर वीज कायदा- 2003 च्या कलम 47 चे उपकलम (5) व उपकलम (1), (अ) नुसार कंपनीने ग्राहकांकडून सुरक्षा ठेव वसुलीचा अधिकार मिळविला आहे.

सुरक्षा ठेव ही नियमानुसार व ग्राहकांसाठी बंधनकारक असून, परिमंडळातील ग्राहकांनी सुरक्षा ठेवीचा भरणा करून सहकार्य करावे.
- दीपक कुमठेकर (मुख्य अभियंता)

Web Title: electricity customer 20 crore interest return