कार्यक्षमतेने कामगिरी बजावल्यास प्रगती निश्‍चित - बी. के. जनवीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

जळगाव - ‘महावितरण’च्या मंडळ, विभाग, उपविभाग व कक्ष कार्यालय या स्तरावरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी तत्पर व दर्जेदार ग्राहक सेवेसाठी दैनंदिन कामाचे नियोजन करायला हवे. ते नियोजन करून प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. शिवाय प्रत्येकाने पूर्ण कार्यक्षमतेने समन्वयातून, सुसंघटितपणे कामगिरी बजाविल्यास प्रगती अटळ आहे, असा कानमंत्र मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी कामगार दिनी दिला. 

महावितरण व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा लघु प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी मुख्य अभियंता जनवीर बोलत होते. याप्रसंगी कार्यकारी अभियंता संजय तडवी, कामगार कल्याण अधिकारी  कुंदन खेडकर, समुपदेशक रागीब अहमद, प्रसिद्ध गायक व अभिनेता संघपाल तायडे, योगशिक्षक सागर साळी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, कामगार कल्याण केंद्रप्रमुख मिलिंद पाटील उपस्थित होते.

‘महावितरण’ने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या ६७ कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्मचाऱ्यांसह निबंध स्पर्धा विजेते व उच्चशिक्षिण घेतलेल्या पाच कामगार पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने विविध आस्थापनातील तीन कामगारांना पुरस्कृत केले. त्यात अनिल पाटील (यंत्रचालक- महावितरण), उल्हास महाजन (सुप्रिम कंपनी गाडेगाव) व जयंत खाचने (बॉश कंपनी) यांचा समावेश आहे.

यावेळी योगशिक्षक सागर साळी यांनी निरोगी जीवनासाठी योग व प्राणायामाचे महत्त्व विषद करून प्रात्यक्षिके घेतली. यावेळी माझा संकल्प, माझे महावितरण, माझे योगदान हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. 
यात पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांनी आगामी वर्षात ‘महावितरण’च्या प्रगतीसाठी काय योगदान देणार हे संकल्प फलकावर नाव व स्वाक्षरीसह लिहिले. जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी सूत्रसंचालन केले. जागृती मोरे यांनी आभार मानले.

Web Title: electricity employee honor b. k. janvir