रिमोटद्वारे मालेगावात 36 लाखांची वीजचोरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

नाशिक - मालेगावमधील तीन व्यावसायिकांविरोधात रिमोटद्वारे 35 लाखांची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरण कंपनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तिघांचे फेरफार केलेले वीजमीटर जप्त करण्यात आले आहेत.

नाशिक - मालेगावमधील तीन व्यावसायिकांविरोधात रिमोटद्वारे 35 लाखांची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरण कंपनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तिघांचे फेरफार केलेले वीजमीटर जप्त करण्यात आले आहेत.

जान मोहम्मद मोहियुद्दीन (एम. एच. प्लॅस्टिक) यांनी 16 लाख 64 हजार, मयूर वसंतराव जोशी (चिंतामणी पॉलिमर्स इंडस्ट्रीज, सायने) यांनी 11 लाख 64 हजार, तर महफूज रेहमान फजलू रेहमान (प्लॉट नं. 49, द्याने) यांनी सात लाख 66 हजारांची वीजचोरी केल्याचे तपासात आढळले. या तिघांविरोधात 36 लाख 19 हजार 739 रुपयांची वीजचोरीची तक्रार महावितरणने नोंदविली आहे.
या तिघांनी वीजमीटरमध्ये बदल करीत सिटी ऑपरेटेड मीटरच्या साह्याने रेझिनकास्ट सिटीमधील कास्टिंग तोडून त्यात बनावट रिमोट सर्किट टाकले.

त्यानंतर रिमोटच्या मदतीने रिमोट सर्किटद्वारे संबंधित मीटरला जाणारा वीजप्रवाह चालू किंवा बंद करण्याची व्यवस्था संशयितांनी तयार केली. त्यामुळे वीज वापराची नोंद वीजमीटरमध्ये होतच नव्हती.

Web Title: electricity theft in malegav