अकरावीच्या पहिल्या फेरीसाठी २१ हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत गुरुवारी (ता. ४) संपली. सायंकाळी पाचपर्यंत २६ हजार ६४० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा भाग- १, तर २१ हजार १८४ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग- २ भरला. अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

नाशिक - महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत गुरुवारी (ता. ४) संपली. सायंकाळी पाचपर्यंत २६ हजार ६४० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा भाग- १, तर २१ हजार १८४ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग- २ भरला. अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.    

एसएससी बोर्डाच्या २० हजार ८३१ विद्यार्थ्यांनी तसेच सीबीएसई ६५७, आयसीएसई ५८५, इतर बोर्ड ११० याप्रमाणे विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळी पाचअखेर अर्ज भरले. ऑनलाइन भरलेल्या अर्जांनाच पहिल्या गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे यापूर्वीच कळविण्यात आले होते. १२ जुलैला पहिली गुणवत्तायादी जाहीर होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh Admission Form Education