आदिवासी मेळाव्यात संस्कृतीचे दर्शन घडवून, घुसखोरी विरोधात एल्गार

भगवान खैरनार
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मोखाडा - मोखाड्यातील गोमघर येथे आदिवासी समन्वय समिती ने आयोजित मेळाव्यात आदिवासी संस्कृतीचे जतन करीत, आदिवासी नृत्य, करण्यात आले आहे. मेळाव्यात आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवून घुसखोरी करणार्‍या धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असा एल्गार करण्यात आला आहे. या मेळाव्यास कोकण विभागातील जिल्ह्यासह नाशिक, नगर, पुणे, आणि मुंबई जिल्हय़ातून हजारो आदिवासी बांधव ऊपस्थित होते. 

मोखाडा - मोखाड्यातील गोमघर येथे आदिवासी समन्वय समिती ने आयोजित मेळाव्यात आदिवासी संस्कृतीचे जतन करीत, आदिवासी नृत्य, करण्यात आले आहे. मेळाव्यात आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवून घुसखोरी करणार्‍या धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असा एल्गार करण्यात आला आहे. या मेळाव्यास कोकण विभागातील जिल्ह्यासह नाशिक, नगर, पुणे, आणि मुंबई जिल्हय़ातून हजारो आदिवासी बांधव ऊपस्थित होते. 

मेळावा सुरू होण्यापुर्वी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ढोलनाच, तारफा नाच, गौरी नाच, नंदी नाचात आदिवासी क्रांतीकारकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. त्यानंतर गोमघर जवळील भव्य पटांगणात आदिवासी मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्यास मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पांडुरंग बरोरा ऊपस्थित होते. त्याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अॅड. देविदास पाटील, दिलीप पटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी रहाणे, कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश कार्यकारीनी सदस्य रतन बुधर आदि मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यात आदिवासी कवी, लेखक, साहित्यिक यांना ही व्यासपीठ देण्यात आले होते. तर" वेडे मन तुझ्यासाठी" या मराठी चित्रपटातील सर्व कलाकार ऊपस्थित होते. या मेळाव्यात आमचे आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवून, घुसखोरी करणार्‍या धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करू नये असा एल्गार सर्व ऊपस्थितांनी केला आहे. सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती असतांना शासनाने आदिवासी तालुके दुष्काळ ग्रस्त जाहीर केलेले नाही. त्यामुळे आदिवासींचे खावटी कर्ज माफ करून, नव्याने खावटी कर्ज देण्याची मागणी या मेळाव्यात करण्यात आली आहे. 

मेळाव्यास मोखाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगिता भांगरे, जव्हार कुटीर रूग्णालयावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड, नायब तहसीलदार पी जी कोरडे यांसह ठाणे, मुंबई भागातील शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांसह शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, राष्ट्रवादी काॅग्रेस प्रदेश कार्यकारीनी सदस्य रघुनाथ पवार, शिवसेना मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील, आदिवासी विकास परिषदेचे ऊत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव, मोखाडा नगराध्यक्ष मंगला चौधरी, पंचायत समिती सदस्या सारीका निकम यांसह हजारो आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मेळाव्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या मेळाव्याचे आयोजन आदिवासी समन्वय समितीचे अध्यक्ष भरत गारे. सचिव दिनकर फसाळे आणि सहकार्यांनी नियोजन केल्याने हजारोंच्या संख्येने आदिवासी ऊपस्थित होते.

Web Title: Eligar against infiltration, appearing in tribal gatherings, and exhibiting culture