Dhule News : वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याची तापीत आत्महत्या

Death News
Death Newsesakal

Dhule News : चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी प्रवीण विजय गवते (वय ४०) याने रविवारी (ता. ४) दुपारी सव्वातीनच्या सुमारास सुकवद-गिधाडे रस्त्यावरील तापी पुलावरून सुलवाडे धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

शिंदखेडा पोलिस ठाण्यात मृताच्या साडूने दिलेल्या खबरीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (employee of power distribution company committed suicide in heat Dhule News)

मृत प्रवीण गवते यांचे साडू नितीन विश्राम सांगळे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार लहान साडू प्रवीण गवते वीज वितरण कंपनीत ऑपरेटर म्हणून नोकरीस आहेत. त्यांची नेमणूक बाळदे (ता. शिरपूर) येथील उपकेंद्रावर असून, ते परिवारासह शिरपूर येथे बालाजीनगरात वास्तव्यास आहेत.

गिधाडेच्या पुलावर प्रवीण गवते यांची मोटारसायकल व चपला पडलेल्या आहेत व ते कुठेही दिसत नाहीत अशी माहिती त्यांना मिळाली.

मासेमारी करणारे व पोहणाऱ्यांनी त्यास बाहेर काढले व शिंदखेडा ग्रामीण रुगणालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन वाघ यांनी मृत घोषित केले. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक चेतन बोरसे तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Nashik Traffic News : ट्रॅफिक जामचा तिढा काही सुटेना; सायंकाळी 2 तास लागतात वाहनांच्या रांगाच रांगा

व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज

मृत प्रवीणने चिमठाणे येथील श्री सिद्धिविनायक व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन वाजून ५१ मिनिटांनी एक पोस्ट टाकली आहे.

त्यात त्याने लिहिलेस की माझ्या मागे चार-पाच गुंड पोरे लागली आहेत. ते सर्व अनोळखी आहेत, मला काही सुचत नाही. माझ्यासोबत तीन लाख रुपये आहेत. मी कसे तरी मला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मला मदत...’ असा मेसेस टाकला होता.

Death News
Nashik News : शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू; या तारखेपर्यंत नोंदणीस मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com