'पदवीधर'साठी नाशिकला अडीच हजार कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नाशिक - विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. 3) होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, नाशिक विभागातील अडीच हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. याबाबत मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मतदानाच्या तयारीविषयी अंतिम आढावा घेतला. त्यासाठी सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. मतदारांचे मतदान कुठे होईल, याबाबतची माहिती असलेल्या केंद्रांचे परिपत्रक उमेदवारांसह सर्व तहसीलदारांना देण्यात आले. निवडणूक कामासाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षक व केंद्राध्यक्षांना तांत्रिक प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे. जिल्ह्यात 388 मतदान केंद्रे आहेत.
Web Title: employee for vidhan parishad election