आदिवासींच्या दफनभूमीवर ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

सटाणा : वटार (ता.बागलाण) येथे आदिवासी बांधवांच्या दफनभूमीवर ग्रामपंचायतीकडून सपाटीकरण केले जात आहे. या जागेवर ग्रामपंचायत प्रशासन बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्याने आदिवासी बांधवांवर मोठा अन्याय होत आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन स्मशानभूमीवरील सपाटीकरण तात्काळ थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा बागलाण तालुका एकलव्य संघटनेतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला. 

याबाबत संघटनेचे रामचंद्र सोनवणे यांनी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात, आम्ही सर्व आदिवासी बांधव वटार येथे गेल्या पन्नास वर्षांपासून वास्त्यव्यास आहेत. गावातील गट नं.११० मधील दोन एकर गावठाण जागा आदिवासी बांधवांच्या स्मशानभूमीसाठी देण्यात आली आहे. या जागेत आम्ही मयत व्यक्तींचा दफनविधी करत असतो. गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून आम्हाला नाहक धमकावले जात आहे. गावठाणच्या जागेवर ग्रामपंचायत प्रशासनाचा अधिकार असला तरी मयत आदिवासी बांधवांचे दफनविधी या जागेत करण्यात आले आहेत. मात्र, आता ग्रामपंचायत या जागेवर आपला मालकी हक्क दाखवून अतिक्रमण करू पहात आहे. 

या जागेवर सपाटीकरण करून ग्रामपंचायत गावासाठी स्मशानभूमी तयार करत असल्याने आमच्यावर मोठा अन्याय होणार आहे. शासनाने या बाबीची सखोल चौकशी करून होत असलेल्या अन्यायाचे निवारण करावे व आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 
निवेदनावर गुलाब सोनवणे, नंदू पवार, भुरा माळी, विष्णू पवार, बापू पवार, युवराज खरे, अंबादास माळी, संतोष मोरे, सुभाष मोरे, हिरामण पवार, कमलाकर माळी, संतोष पवार, वसंत माळी, राजू माळी, चिंतामण पवार, श्रावण पवार, राकेश माळी, मन्साराम पिंपळसे, दादाजी पवार, शरद अहिरे, रवी अहिरे, प्रभाकर गांगुर्डे, मिलींद अहिरे, अशोक पवार आदींसह आदिवासी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Web Title: Encroachment by the Gram Panchayat on the graveyard of tribal people