दमदार पावसाने पिकांची वाढ जोमात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

जळगाव - गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांची वाढ येत्या आठवडा भरात जोमाने होईल, सोबतच यंदा पीक चांगले येईल, असा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. पिकांची वाढ पाहुन शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या शनिवारपासून पावसाचा जोर होता. काल थोडीशी उसंत दिली. आज सकाळपासून ऊन पडल्याने तीन चार दिवसांपासून पावसामुळे आलेली शिथिलता दूर झाली आहे. संततधार पावसाने शेतात पाणी साचल्याने, सोबतच गाराही झाल्याने शेतात बैलगाडी घेऊन जाणे किंवा पायी जाणे शक्‍य नव्हते. यामुळे काल पावसाने दिलेली थोडीशी उसंत व आज सकाळपासून पडलेल्या उन्हामुळे शेतकरी शेतात दिसून आहे.

उन्हामुळे शेतात वाफसा होत आहे. वाफसा झाल्यानंतर शेतकरी कोळपणीच्या कामांना सुरवात करतील. कपाशी पिकांना खत देणे आदी कामांना सुरवात होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली. शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर करावा असे आवाहन चौधरी यांनी केले आहे.

७७.७२ टक्के पेरण्या
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७२.७२ टक्के पेरण्या झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली. एकूण ८ लाख ४४ हजार ८२६ हेक्‍टरवर पेरण्या अपेक्षित होत्या. त्यापैकी ६ लाख १४ हजार ३८९ हेक्‍टरवर पेरण्या झालेल्या आहेत. उर्वरित २८ टक्के पेरण्याही आठवड्याभरात पूर्ण होतील असा अंदाज आहे.

Web Title: energetic rains crop growth