कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रेम हीच माझी प्रेरणा- खडसे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

भुसावळ - कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रेम हीच माझी प्रेरणा आणि शक्ती आहे. क्लीन चिट मिळाल्याने पक्ष विस्ताराच्या कामासाठी दुप्पट जोमाने कामाला लागणार आहे; असे मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज भुसावळ रेल्वे स्थानकावर केले. 

भोसरी जमीन प्रकरणी एसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर खडसे यांच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया पार पडली. त्यांनतर ते प्रथमच भुसावळला आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहाने त्यांचे स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले.

मंत्रीपद मिळणार का असे त्यांना विचारले असता असे खडसे यांनी उत्तर देण्याचे टाळून पक्ष विस्तारासाठी झटणार असल्याचे म्हटले. पूर्वीपेक्षाही अधिक वेगाने आणि उत्साहाने पक्षासाठी काम करणार असल्याचेही ते म्हणाले. 

यावेळी आमदार संजय सावकारे प्रा. सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भुसावळ-यावल-रावेर मुक्ताईनगर बोदवड सावदा आदी भागातून कार्यकर्ते सकाळी सहापासूनच जमा झाले होते. पठाणकोट एक्स्प्रेसमधून खडसे यांचे आज आगमन होताच भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. त्यानंतर पालिकेने दिलेल्या सोलर कारमध्ये खडसेंसह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे स्थानापन्न झाले. फलाटावरूनच मिरवणूक काढण्यात आली. असंख्य कार्यकर्त्यांसह रेल्वे स्थानकाबाहेर आले होते. त्यावेळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. 

त्याआधी मिरवणूकीत नगराध्यक्ष रमण भोळे, शहर अध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, प्रा. नेवे यांनी ठेका धरला. असंख्य कार्यकर्त्यांना यावेळेस नाचण्याचा मोह आवरला नाही. एखाद्या मंत्र्याला लाजवेल अशा प्रकारचे स्वागत पाहुना प्रवासीही अवाक झाले होते.

Web Title: The enthusiasm and love of the workers is my inspiration