‘गुंतवणुकीसाठी इक्विटीचा पर्याय उत्तम’

‘गुंतवणुकीसाठी इक्विटीचा पर्याय उत्तम’

नाशिक - इक्विटी या ॲसेट क्‍लासच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळविणे सहज शक्‍य आहे. संतुलित इक्विटी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय असल्याचे मत एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा श्‍यामली बसू यांनी येथे व्यक्त केले. 

हॉटेल एसएसके सॉलिटेअर येथे ‘सकाळ मनी’ आणि एचडीएफसी म्युच्युअल फंड आयोजित  गुंतवणूकदार जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे विभागीय व्यवसायप्रमुख योगेश परांजपे आणि ‘सकाळ मनी’चे व्यवसायप्रमुख रोशन थापा उपस्थित होते.  

बसू यांनी गुंतवणुकीसाठी कोणताही विशिष्ट फॉर्म्युला नसल्याचे स्पष्ट करीत आपल्या जोखीम क्षमतेनुसार ‘ॲसेट अलोकेशन’चे महत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर दीर्घकाळासाठी इक्विटी, तर लघू कालावधीसाठी पारंपरिक बचतीच्या साधनांचा पर्याय उत्तम असल्याचे सांगितले. तात्कालिक राजकीय किंवा आर्थिक घडामोडींकडे लक्ष न देता व्यावहारिक दृष्टिकोन ठेऊन दीर्घकाळासाठी शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास सरासरी १५ टक्‍क्‍यांच्या आसपास परतावा मिळविणे सहज शक्‍य असल्याचे नमूद केले. 

माने यांनी गुंतवणूक करताना विश्‍वासार्ह माध्यमाचे महत्त्व स्पष्ट करीत ‘सकाळ’ची भूमिका स्पष्ट केली. ‘सकाळ मनी’चे उपसंपादक प्रवीण कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तसेच ‘सकाळ मनी’च्या उपक्रमांची माहिती दिली. ‘सकाळ’चे युनिट व्यवस्थापक राजेश पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com