‘राज्यस्तरीय आविष्कार’साठी ईश्‍वरी खंडेलवालची निवड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

धुळे - नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी येथील ईश्‍वरी प्रकाश खंडेलवालची निवड झाली. विद्यावर्धिनी महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी असून, ‘मधुरांगण’च्या समन्वयिका मीना खंडेलवाल यांची कन्या आहे. राजवाडे संशोधन मंडळाचे क्‍युरेटर श्रीपाद नांदेडकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत तिला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. पदव्युत्तर पदवी गटातून पोस्टर प्रकारात मोडी लिपीतील पोस्टर सादर केले होते.

Web Title: eshwari khandelwal selection