Child Marriage News : बालविवाह होण्यापूर्वीच पोलीस पोहचले मंडपात; पोलीसांची कार्यवाही

Child Marriage News
Child Marriage Newsesakal

Nandurbar News : सिसा पाडली (ता.धडगाव) येथे गेल्या ३० मेस नियोजित बालविवाहापूर्वीच ऑपरेशन अक्षताच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लग्न लागण्यापूर्वीच मंडपात हजेरी लावून बालविवाह थांबविला.

दोन्हीकडील पालकांचे समुपदेशन करून त्यांना सज्ञान झाल्यावरच मुलगा-मुलीचा विवाह करण्याचा सल्ला या वेळी देण्यात आला.

याबाबत एका सुज्ञ नागरिकाने दुरध्वनीद्वारे पोलिसांना माहिती दिली होती. त्यानुसार धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील सिसा पाडली गावात ३० मेस एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता. (Even before child marriage police reached pavilion Action of Dhadgaon Police Sisa Padli Nandurbar News)

माहिती मिळताच धडगांवचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना कळविले. त्यावर त्यांनी हा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याचे आदेश दिले होते.

त्याप्रमाणे श्री. पठाण यांनी स्थानिक अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तत्काळ माहिती काढून खात्री करून घेतली.

सिसा पाडली याच गावातील तरूणासोबत हा बालविवाह होणार होता. परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या घरी जावून सर्वांना कायदेशीर बाबी समजावून सांगत त्यांचे समुपदेशन केले.

Child Marriage News
Crime News Nagpur : कावीळच्या औषधीसाठी आली अन् बाळ घेऊन गेली

दोन्हीकडच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. दरम्यान, अल्पवयीन मुलगी, नियोजित वर व दोघांच्याही पालकांना कायदेशीर नोटीसही देण्यात आली आहे.

या कार्यवाहीबद्दल नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यापुढेही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. आजपावेतो जिल्ह्यातील ६३४ पैकी ६३१ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत.

उर्वरीत ०३ ग्रामपंचायतींचे ठरावदेखील लवकरच घेण्यात येतील. नंदुरबार जिल्हा पोलीसांना ऑपरेशन अक्षतांतर्गत तब्बत २१ बालविवाह रोखण्यात यश आले असल्याचेही श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Child Marriage News
Dhule Municipal Corporation : विजय सनेर यांच्याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी

अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. पठाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले, हवालदार राजेंद्र जाधव, अंमलदार गणेश मराठे, महेश माळी, रितेश बेलेकर व सिसा पाडलीचे पोलीस पाटील कालुसिंग पिसा वळवी व अक्षता सेलच्या सदस्यांनी ही कामगिरी केली.

Child Marriage News
Dhule News : रेड्याच्या वेदना कळतात; धुळेकरांच्या का नाहीत? : माजी आमदार प्रा. शरद पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com