PHOTOS : अशा रितीने भगूर विंचूरला जोडणाऱ्या उड्डाणपूलावरील मार्ग मोकळा केला

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 10 November 2019

भगूर विंचूरला जोडणारा उड्डाणपूल ह्या पुलाची अंदाजी किंमत १५ कोटी ५१ लाख ५८ हजार ५३२ कोटीची असून त्याचा निधी खासदार समीर भुजबळ यांनी मंजूर करून दिला होता. कामाचा पूर्णत्वाचा  कालावधी १८ महिने सांगितला होता.  आज २ वर्षांपेक्षा अधिक काळ गेला आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी लोकार्पण सोहळ्याला अचारसंहिता व मंत्र्यांची तारिक   मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून  ह्या पुलावर लोखंडी बॅरिकेड टाकण्यात आले होते.

नाशिक : भगूर विंचूरला जोडणारा उड्डाणपूल जो महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बांधण्यात आलेला आहे. याचे लोकार्पण होत नसल्यामुळे लोखंडी बॅरिकेड टाकण्यात आले आहेत. या ठिकाणी जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली हे लोखंडी बॅरिकेड हटवून लोकांसाठी रस्ता मोकळा करून देण्यात आला.

Image may contain: 16 people, people smiling, people standing and outdoor

अंदाजे १५ कोटी मंजूर झालेल्या पुलाचे काम अजून नाहीच..
भगूर विंचूरला जोडणारा उड्डाणपूल ह्या पुलाची अंदाजी किंमत १५ कोटी ५१ लाख ५८ हजार ५३२ कोटीची असून त्याचा निधी खासदार समीर भुजबळ यांनी मंजूर करून दिला होता. कामाचा पूर्णत्वाचा  कालावधी १८ महिने सांगितला होता.  आज २ वर्षांपेक्षा अधिक काळ गेला आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी लोकार्पण सोहळ्याला अचारसंहिता व मंत्र्यांची तारिक   मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून  ह्या पुलावर लोखंडी बॅरिकेड टाकण्यात आले होते. ह्या लोखंडी  बॅरिकेडमुळे लोकांना अडचण होत असून दोन वेळा अपघात झाले व यापुढे देखील जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे.

Image may contain: 2 people, people standing and outdoor

 

Image may contain: 11 people, people smiling, people standing and outdoor

पूलावर स्ट्रीट लाईट देखील बसवले नाहीत. उद्घाटनासाठी एखाद्या अपघाताला आमंत्रण देणे योग्य नाही. आज देवळाली मध्ये सत्ता बदलली असून आमदार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. यासाठी पक्षाच्या वतीने लोकांप्रती एक जबाबदारी म्हणून आज (ता.१०) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड हटवून पूल लोकांसाठी मोकळा करून दिला आहे, असे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले.  

Image may contain: one or more people and outdoor

उड्डाणपुला संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
उड्डाणपुलाच्या बाजुलाच नुतन माध्यमीक शाळा व कॉलेज असल्यामुळे वाहनांचे वेग नियंत्रणात रहाण्यासाठी दोन्ही बाजुला स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली. 
तसेच भगूरच्या व्यापाराला नुकसान होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे खालच्या बोगद्याचे काम देखील लवकरात लवकर पुर्ण करावे अश्याची मागणी देखील या वेळी करण्यात आली.
Image may contain: one or more people, people standing, car and outdoor

या वेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे,देवळाली कॅम्प कार्याध्यक्ष प्रशांत बच्छाव, विशाल बलकवडे, बिसमिल्ला खान, आनंद झांजरे, निलेश गोरे, अमोल पाटील, राहूल कापसे, मंजुशा महेश, गायत्री झांजरे, स्वाती मोरे, संगिता झाजरे, साहिल मोरे, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकरते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eventually the path to the bridge is opened at Nashik