"जलयुक्त'च्या कामांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

नाशिक - जलयुक्त शिवार अभियानातील 2016-17 मधील अपूर्णावस्थेतील आणि प्रस्तावित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सरकारने 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. तसेच पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील गावांना इंधनासाठी प्रत्येकी दीड लाख रुपये देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. 

राज्यात या अभियानातंर्गत 2016-17 मध्ये 5,291 गावांची निवड करण्यात आली होती. या गावातील कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची मुदत देण्यात आली होती; पण गावातील काही कामे अजूनही अपूर्ण असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आल्याने अंतिम मुदतवाढीचा निर्णय घ्यावा लागला आहे. दरम्यान, स्पर्धेतील सहभागी गावांमध्ये मृद व जलसंधारण कामे श्रमदानाद्वारे करावयाची आहेत. अशा गावांना प्रोत्साहन म्हणून यंत्राद्वारे कामे होणाऱ्या गावांना इंधनासाठीचे पैसे 2018-19 मधील निधीतून देण्यात येतील. या अभियानांतर्गत 2015-16 मध्ये 6,202 गावे, 2016-17 मध्ये 5,291 गावे, 2017-18 मध्ये 5,018 गावे निवडण्यात आली. या एकूण गावांपैकी 11 हजारांहून अधिक गावांना पाणी उपलब्ध झाले आहे. 2018-19 मधील कामांसाठी गावांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. 

Web Title: Extension for jalyukt shivar abhiyan work till June 30