विकृत परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींनी आत्मनिर्भर बनण्याची गरज - पूनम राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

खामखेडा (नाशिक) : सध्या महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून हे रोखण्यासाठी डॉक्टरांना जसा आजार सांगितल्या शिवाय इलाज करता येत नाही, तस महिला व मुलींवरील अत्याचारांची माहिती पोलीसांना न दिल्यास कारवाई करणे शक्य नसते यामुळे महिला व मुलींनी निर्भयपणे समाजातील विकृत परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुढे येणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दामिनी पथकाच्या फौजदार पूनम राऊत यांनी येथे केले.

येथील जनता विद्यालय, लोहोणेर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीना दामिनी पथकाने नुकतेच मार्गदर्शन केले.याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र भदाणे होते. राऊत पुढे बोलताना म्हणाल्या की, समाजात दिवसेंदिवस महिलांना अबला समजुन दुय्यम वागणुक दिली जाते.तसेच गप्प राहुन देखिल अत्याचारात वाढ होत अाहे.समाजातील मुलींनी अाता गप्प न राहता अात्मनिर्भर बनणे गरजेचे असुन अत्याचाराविरुद्ध अावाज उठवण्यासाठी पुढाकार घ्यावा.स्वरक्षणाचे धडे घेउन सक्षम झाले तरच समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल असेही त्या म्हणाल्या.यावेळी त्यांनी १०९१ या टोल फ्री क्रमांकावर सम्पर्क साधण्याचा आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनित पवार यांनी केले.मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे राऊत यांनी दिली. याप्रसंगी बी जी सुर्यवंशी, यु के भदाणे,एस के वाघ,आर के पाटील,सुनील एखंडे आदि शिक्षक ,शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. विवेक पवार यांनी आभार मानले.

Web Title: for facing bad condition girls have to become a self sufficient said poonam raut