Crime News : बनावट नोटांची विक्री; एकाला पोलिस कोठडी

शहरात बनावट चलनी नोटांची विक्री करणाऱ्या संशयिताला आझादनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली
Crime News
Crime Newssakal
Updated on

धुळे- शहरात बनावट चलनी नोटांची विक्री करणाऱ्या संशयिताला आझादनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली. मुंबई- आग्रा महामार्गावरील एका ढाब्यावर सापळा रचत रविवारी (ता. १६) ही कारवाई झाली. संशयिताकडून २५ हजार ९०० रुपयांच्या शंभर, दोनशे, पाचशेच्या बनावट नोटा जप्त केल्या. न्यायालयाने संशयिताला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com