कोट्यवधींच्या बनावट नोटांमुळे टपाल विभाग धास्तावलाय 

postoffice
postoffice

नाशिक - नोटा बदलण्यात टपाल विभागाने 30 टक्के सहभाग दिला आहे; पण बनावट नोटा ओळखायच्या कशा, याची पुरेशी माहिती नसतानाच बनावट नोटा ओळखणारे यंत्र टपाल कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे कोट्यवधीच्या जमा झालेल्या बनावट नोटा प्रकरणामुळे टपाल विभाग धास्तावला आहे. टपाल विभागाच्या नियमानुसार व्यवहाराला जबाबदार असलेल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. हा मुद्दा भारतीय मजदूर संघ संलग्न भारतीय पोस्टल एम्प्लॉइज असोसिएशनच्या अधिवेशनात गाजला. 

टपाल कार्यालयात जमा झालेल्या बनावट नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅंकेने नकार दिला आहे; पण अशा नोटा स्वीकारण्यात आमची चूक काय, असा प्रश्‍न उपस्थित करून भारतीय पोस्टल एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष शिवकांत मिश्रा यांनी या संबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालणार असल्याचे सांगितले. त्या वेळी अधिवेशनास उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी टाळ्यांचा कडकडाट केला. कॅनडा कॉर्नरच्या समर्थ मंगल कार्यालयात झालेल्या अधिवेशनाच्या सांगता कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र-गोवा सर्कलच्या अध्यक्षपदाची सूत्रे मुंबईचे रमेश अंजारिया यांच्याकडे, तर सचिवपदाची सूत्रे मुंबईचेच बापू दडस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. खजिनदार म्हणून मुंबईचे श्रीराम जमलू यांची निवड करण्यात आली आहे. 

10 हजार रिक्तपदे भरा - मिश्रा 
देशभरात टपाल विभागात 10 हजार पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरून उपलब्ध मनुष्यबळावरील कामाचा ताण हलका करावा, अशी मागणी करून मिश्रा म्हणाले, की पदांच्या भरीतत गैरव्यवहार केल्याने यापूर्वीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. तसेच टपाल कार्यालयात गैरव्यवहार करण्यासोबत इतरांनाही सहआरोपी केले जाते. खरे म्हणजे, देशभरात होणाऱ्या 20 हजार कोटींच्या वार्षिक उलाढालीचा विचार करता, गैरव्यवहाराचे किती गंभीर स्वरूप आहे, हे लक्षात येते. पण अशा प्रकरणांमध्ये मुख्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली जावी. इतरांना सहआरोपी केले जाऊ नये, अशी आमची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com