
काळ्या रंगाची पल्सर रस्त्याच्या कडेला लावून ट्रकचालकांकडून पैसे मागत असताना पाहिले. पंचवटी गुन्हे शोधपथकाच्या ताब्यात दिले. या दोन्ही संशयितांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात पोलिस असल्याची बतावणी करून पैसे मागितले. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला; परंतु चौकशीदरम्यान या संशयितांनी सोनसाखळी चोरीची कबुली दिली होती.
नाशिक : मागील आठवड्यात ट्रकचालकाकडून भररस्त्यात पैसे मागणाऱ्या दोन तोतया पोलिसांना रंगेहाथ म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या दोन संशयित तोतया पोलिसांकडून दहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्यांच्याकडून 233 ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापलेल्या चार दुचाकी असा एकूण दहा लाख 36 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
Photo : म्हसरूळ येथे जप्त केलेला मुद्देमाल
दोन तोतया पोलिसांना अटक; सव्वादहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मंगळवारी (ता. 26) मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास एका ट्रकचालकाने तारवालानगर येथील लामखेडे मळा चौफुलीवर दोन संशयित पोलिस असल्याची बतावणी करून पैसे मागत असल्याचे पोलिसांना सांगितले. घटनास्थळी पोलिस शिपाई गुंबाडे व चव्हाण यांनी धाव घेत अक्षय दोंदे (वय 21, रा. बी-7, शिवनगर, तलाठी कॉलनी), भूषण जाधव (रा. प्लॉट नं. 75, शिवनगर, तलाठी कॉलनी) हे संशयित काळ्या रंगाची पल्सर रस्त्याच्या कडेला लावून ट्रकचालकांकडून पैसे मागत असताना पकडले. पंचवटी गुन्हे शोधपथकाच्या ताब्यात दिले. या दोन्ही संशयितांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात पोलिस असल्याची बतावणी करून पैसे मागितले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला; परंतु चौकशीदरम्यान या संशयितांनी सोनसाखळी चोरीची कबुली दिली होती.
अक्षय दोंदे
नाकाबंदी नसेल त्या ठिकाणी सोनसाखळी चोरी करत
पंचवटी पोलिसांनी दोन्ही संशयित तोतयांनी पंचवटी, म्हसरूळ प्रत्येकी तीन, इंदिरानगर, गंगापूर दोन, एक भद्रकाली असे दहा सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. संशयित अक्षय दोंदे, भूषण जाधव यांचे नातेवाईक पोलिस दलात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे संशयित ज्या ठिकाणी नाकाबंदी नसेल त्या ठिकाणी सोनसाखळी चोरी करत असत.
भूषण जाधव