कुटुंबप्रमुखांनी शौचालय बांधून नियमित करावे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

कुसुंबा - संपूर्ण स्वच्छ भारत अभियान संकल्पनेतून अल्पभूधारक अनुसूचित जाती- जमाती व महिला कुटुंबप्रमुखांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, अशा कुटुंबधारकांनी शौचालय बांधून नियमित करावा, शासनाच्या बारा हजारांचे प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच शोभाबाई शिंदे, ग्रामविस्तार अधिकारी बी. एच. पाटील यांच्यासह सदस्यांनी केले आहे.

स्वच्छ निर्मल भारत हागणदारी मुक्त होण्याच्या संकल्पनेतून शासकीय अनुदान २०१७ नंतर बंद होण्याची शक्‍यता आहे. गावात १७५८ पैकी केवळ ७२७ कुटुंबांकडे शौचालय आहे. शौचालयाचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधून प्रस्ताव सादर करावेत. ‘शौचालय बांधा घरोघरी, शासनाचे अनुदान आपल्या दारी’नुसार जास्तीतजास्त कुटुंबांनी लाभ घ्यावा, उघड्यावर शौचविधीस जाणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आवाहन सरपंच शिंदे, उपसरपंच अरुण परदेशी, ग्रामसेवक पाटील यांच्यासह सदस्य मंडळाने केले. ज्या कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी जागेचा अभाव असेल, अशा कुटुंबांनी सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा, असेही सरपंच शिंदे यांनी स्पष्ट केले.

ग्रामस्थांनी प्रतिसाद दिल्यास योजना पूर्णत्वास नेण्यास वेळ लागणार नाही, शासनाकडून प्रत्येकाला शौचालय बांधून दिले जात आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घेऊन गाव हागणदारीमुक्त करावे.
- बी. एच. पाटील, ग्रामविस्तार अधिकारी, कुसुंबा

कुसुंब्यात ज्या कुटुंबाकडे शौचालये नाहीत, अशा नागरिकांनी लवकरच शौचालय बांधून शासनाच्या बारा हजार रुपये अनुदानाचा लाभ घ्यावा. हागणदारीमुक्त करून गाव रोगराई टाळावी.
- शोभाबाई शिंदे, सरपंच, कुसुंबा

Web Title: Family to build a regular toilet