जिल्हाभरातील अवयव दात्यांचा बनकर परिवाराने केला गौरव

bankar
bankar

येवला - अवयवय दान केल्याने आयुष्य कमी होत नसून वाढते. जिल्ह्यातील ज्या बांधवांनी व भगिनींनी अवयव दान केले, अशांचा सत्कार करुन अंबादास बनकर यांनी अवयवयदानाला प्रोत्साहन दिले आहे, असे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले. मातृ पितृ पुण्यस्मरण व अवयव दान भगिनींचा गौरव आणि पुरुषोत्तम मासा निमित्त अंबादास बनकर व बनकर परिवाराच्या वतीने भव्य श्रीमद् भागवत कथा व कीर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या (मंगळवार) सातव्या दिवशी ढोकमहाराज बोलत होते. 

यावेळी बनकर परिवाराच्या वतीने यमुनाबाई कव्हात, भिमाबाई गायकवाड, मिराबाई बनकर, मिरबाई गायकवाड, मुक्ताबाई मढवई, उत्तमराव शिंदे, भागीनाथ झगझाप, लताबाई गंडाळ, कांचनमाला पाटील, सिंधुबाई जाधव, ताराबाई गोरे, प्रकाश डोंगमाने, पुष्पा शिंदे, विजय दिंडे, शोभा वाघ, सुशिला चौधरी, रत्ना डोंगरे, संगिता आहेर या जिल्हाभरातील विविध दात्यांनी यांनी अवयव दान केल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. 

जिवापाड प्रेम करणे काय असते हे आपल्या कृतीतून दर्शविणाऱ्या मंडळींचा बनकर कुटूंबियांनी सत्कार सोहळा ठेवला ही बाब येवलेकरांसाठी व जिल्ह्यासाठीही निश्चितच भुषणावह आहे. आपला भाऊ मुत्रपिंड विकारातून बरा व्हावा, बरा झाल्यावर मोठ्या सप्ताहाचे आयोजन करु असे सांगणारे बनकर यांनी तो सोहळा आयोजित केला आहे. त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजे, असे प्रतिपादन ढोक महाराज यांनी केले.

मोक्षाचा मार्ग गृहस्थाश्रमातुनच - रामगिरी महाराज
संस्कारपुर्वक विवाह करुन जीवनातील सर्व भौतीक सुखांचा संयत अनुभव घेतांनाच सामाजिक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी गृहस्थाश्रम स्विकारावा लागतो. हे साक्षात परम परमात्म्याने श्रीकृष्णाच्या रुपाने दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. 

आज सायंकाळी भागवत कथेत महंत रामगिरी यांनी श्रीकृष्ण गृहस्थाश्रम, पांडवांचा राजसुय यज्ञ, सुदामा चरित्र, यदु-अवधूत संवाद, कलीमहिमा, भगवंतांचे निजधाम गमन व भागवत ग्रंथ वाचनाची फलश्रुती या विषयावर निरुपण केले. यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, आर.एम.वाणी, अंबादास बनकर, संजय बनकर, महेंद्र काले, नगरसेवक प्रविण बनकर, किसन धनगे, बाळासाहेब कापसे, मधु महाराज, बाळासाहेब लोखंडे, बी. आर. लोंढे, ऍड. इंद्रभान रायते, व्यंगचित्रकार अनंत दराडे, वसंत पवार, भागवतराव सोनवणे, अर्जुन कोकाटे, संतोष खैरनार, भास्कर गायकवाड, दत्ता शिरसाठ,  अंकुश शिरसाठ, प्राचार्य रामदास भड, राजेंद्र गायकवाड व बनकर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com