फांगदर प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

खामखेडा येथील फांगदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. सकाळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सदस्य व पालकांच्या उपस्थित प्रभात फेरी काढण्यात येऊन गुलाबपुष्प देत पहिलीच्या वर्गातील नवीन प्रवेशित विध्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

खामखेडा (नाशिक ) - खामखेडा येथील फांगदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. सकाळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सदस्य व पालकांच्या उपस्थित प्रभात फेरी काढण्यात येऊन गुलाबपुष्प देत पहिलीच्या वर्गातील नवीन प्रवेशित विध्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

विध्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात देवळयाचे तहसीलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी महेश पाटील, देवळा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, उपसरपंच बापू शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, माजी सरपंच दादाजी बोरसे, नानाजी मोरे, समिती सदस्य संजय बच्छाव केंद्रप्रमुख शिरीष पवार, मुख्याध्यापक संजय गुंजाळ यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले.

शालेय परिसरातील स्वच्छता, उन्हाळ्यात झाडांची घेतलेली निगा व हिरवाईने नटलेली शाळा, आदिवासी वस्तीवरील अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत असलेले अध्यापन पहात शिक्षक व ग्रामस्थांचे कौतुक केले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक शाळांनी अध्यापन करत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत व ग्रामपंचायतीने शाळांना ही साधने पुरवण्यासाठी लोकसहभाग व सामाजिक संस्था, देणगीदारांकडे मदतीचे आवाहन करावे असे यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापू वाघ, माजी सरपंच गोकुळ मोरे, सागर पवार, बाळासाहेब आहेर, विनोद मोरे, बबन मोरे, दीपक बच्छाव, दीपक मोरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक संजय गुंजाळ यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Web Title: Fangdar Primary School frist day