रस्त्यावर उतरा, शेतशिवारात जा !- खासदार डॉ. भामरे

रमाकांत घोडराज | Saturday, 26 December 2020

कृषी विधेयके शेतकरीहिताचे असल्याची बाब शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचे सैनिक बनून रणांगणात उतरले पाहिजे.

धुळे ः कृषी विधेयकांना विरोधाच्या अनुषंगाने विरोधक भाजपविरोधात एकवटले आहेत व त्यांना राष्ट्रद्रोही ताकदीची साथ मिळत आहे, असा सनसनाटी आरोप करत केंद्र सरकारने केलेली कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या फायद्याचीच आहेत, हे पटवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे, शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांना फायदे समजून सांगावेत, असे आवाहन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. 

आवर्जून वाचा- लवयात इतके क्रौर्य आले कुठून? -

 

Advertising
Advertising

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. एकूण १८ हजार कोटी रुपयांचा हा निधी वितरित केल्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. हा थेट संवादाचा कार्यक्रम भाजपतर्फे येथील राम पॅलेसमध्ये दाखविण्यात आला. 

वाचा- ग्रामपंचायत निवडणूक ः बहुतांश ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता -

खासदार डॉ. भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती बापू खलाणे, पंचायत समिती सभापती प्रा. विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव, राम भदाणे, संग्राम पाटील, आशुतोष पाटील, श्‍याम बडगुजर, नगरसेवक नागसेन बोरसे, संजय पाटील, भगवान देवरे, युवराज पाटील, हर्षकुमार रेलन, देवेंद्र सोनार, शंकरराव खलाणे, शांताराम पाटील आदी उपस्थित होते. 

डॉ. भामरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की कृषी विधेयके शेतकरीहिताचे असल्याची बाब शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचे सैनिक बनून रणांगणात उतरले पाहिजे. विरोधकांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला पाहिजे. धुळ्यातील पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी बाजार समितीत जात कृषी विधेयकांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे