किकवारी खुर्द येथे शेतकऱ्यांचे आंदोलन ; भाजीपाला पिकांवर फिरवला ट्रॅक्टर

रोशन भामरे
रविवार, 3 जून 2018

भाजीपाला व अन्य शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. पण अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी मतलब नाही.

तळवाडे दिगर : शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशी किकवारी खुर्दच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला, दूध टाकून संपूर्ण कर्जमाफी, शेतीमाला हमीभाव, स्वामिनाथन आयोग लागू करावा या मागण्यांसाठी बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द येथे सटाणा-तळवाडे रस्त्यावर आदोलन करून भाजीपाला, दूध रस्त्यावर टाकून त्यावरून ट्रॅक्टर फिरवण्यात आला.

शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशा मागण्या रास्त आहे. सरकारला शेतकऱ्यांचे कष्ट, वेदना व समस्यांची जाणीव नाही. हे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे. पण अन्नदात्या शेतकऱ्यांचा कोप या सरकारची गच्धंती करू शकतो. सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

सरकारने कवडीमोल दराने विकल्या जाणऱ्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा. तसेच ठरलेल्या हमीभावानुसारच शेतीमालाची खरेदी करावी. त्यासाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा. यासाठी सटाणा-तळवाडे रस्त्यावर शेतीमाल फेकून आंदोलन करून सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी किकवारी गावाचे सरपंच केदा काकुळते म्हणाले की, आश्वासने देण्यात माहीर पण कृतीशून्य व असंवेदनशील सरकारे केंद्रात व राज्यात सातेत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस आणखी गंभीर बनत आहेत. गेल्या सहा महिन्यापासून भाजीपाला पिकांचा बाजारापर्यंत नेण्याचा खर्च देखील निघत हेच का सरकारचे अच्छे दिन ?

भाजीपाला व अन्य शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. पण अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी मतलब नाही. ते उद्योगपती रेड कॉर्पोट टाकण्यात मग्न आहेत. शेतकरी हा अन्नदाता,जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या समस्या व मागण्याची सरकारने दखल न घेतल्यास या सरकारला सत्तेवर आणणारा हाच शेतकरी या सरकारला पायउतार करू शकतो,याचे भान सत्ताबेभान सरकारने ठेवण्याची गरज आहे.

शेतकरी सहनशील आहे म्हणून त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचा प्रयत्न सरकारने थाबवावा व शेतीमाल व भाजीपाल्याच्या, दुधाच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागांनी गावातील गावकऱ्यांनी केली. त्यावेळी स्मार्टग्राम किकवारी खुर्दचे सरपंच केदा काकुळते, यशवंत धोंडगे,धनंजय काकुळते,राहुल कापडणीस,नथू सावकार,प्रभाकर काकुळते,दतात्रेय काकुळते, दिलीप काकुळते,गणेश काकुळते,संजय काकुळते,अनिल काकुळते,अण्णा काकुळते,केशव काकुळते दत्तू सावकार,शरद काकुळते,वैभव आहिरे,विशाल काकुळते,सचिन काकुळते,बाळू काकुळते,तुषार काकुळते यांच्यासह मोठ्या प्रमाणत शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmer Agitation At Kikwari Khurd tractor on vegetable crop