सक्तीच्या वसुलीविरोधात सविनय कायदेभंग - चटप

Wamanrao-Chatap
Wamanrao-Chatap

नाशिक - जिल्हा बॅंकेसह अन्य बॅंकांकडून सक्तीची कर्जवसुली थांबवावी; अन्यथा शेतकरी सविनय कायदेभंग करतील, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी दिला.

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात कर्जमुक्ती आंदोलन व थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा मेळावा पंचवटीतील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाला. मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

‘बॅंका एकीकडे मोठ्या कर्जबुडव्यांना सोडून देत आहेत. दुसरीकडे, बॅंकांकडून सक्तीची कर्जवसुली, शेतकऱ्यांच्या जमिनींची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. अशा प्रकारच्या कर्जवसुलीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील,’’ असा इशाराही चटप यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com