शेतकऱ्यांना फसविणाऱ्या बाजार समित्यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

नाशिक  - जिल्ह्यातील दीड हजार कांदा उत्पादकांचे पाच कोटी थकबाकी देण्यास व्यापाऱ्यांनी टाळाटाळ करताच, बाजार समित्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाऊस पाडला. त्यामुळे सहकार विभागाने अखेर मनमाड, देवळा, उमराणे, येवला, मालेगाव बाजार समित्यांच्या विरोधात असून नोटीस बजावली. तसेच 11 मेपर्यंत खुलासा मागवण्यात आला असून, 14 मेच्या दुपारी तीनपर्यंत खुलाशासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे.

"कांदा उत्पादकांची पाच कोटींची फसवणूक' हे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी मनमाड, देवळा, उमराणे, येवला, मालेगाव आणि नामपूर बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने करे यांनी पाच बाजार समित्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Web Title: farmer cheating market committee notice