अमळनेरला शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

कर्ज फेडण्याच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

अमळनेर : जानवे (ता. अमळनेर) येथील शेतकरी गोकूळ सुपडू पाटील (वय 65) यांनी मंगळवारी (ता. 14) गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाटील यांच्या नावावर गावातील विकास संस्थेचे 80 हजार, पतसंस्थेचे 50 हजार तसेच हात उसनवारीचे एक लाख रुपयांचे कर्ज होते.

कर्ज फेडण्याच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. याप्रकरणी येथील अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: farmer commits suicide in amalner