कर्ज, नापिकीला कंटाळून मालेगावमध्ये तरुणाची आत्महत्या

प्रमोद सावंत
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मालेगाव : सततची नापिकी, दुष्काळी स्थिती, कर्जबाजारीपणाला कंटाळून वजीरखेडे (ता. मालेगाव) येथील निलेश धर्मराज ह्याळीज (वय २९) या तरुण शेतकऱ्याने शनिवारी पहाटे विहीरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर सुमारे पाच लाख रुपये कर्ज होते. यातील चार लाखाचे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाचे होते.

गेली दोन वर्षे तालुक्यात दुष्काळ होता. या वर्षीच्या गंभीर दुष्काळामुळे खरीपाचा दाणा आला नाही. रब्बीची शाश्‍वती नाही. यामुळे कर्ज फेडावयाचे कसे? व कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा यातूनच तरुणाने गळ्याला फास लावला.

निलेश हा ह्याळीज कुटुंबाचा एकुलता मुलगा होता. त्याच्या वडिलांचे यापुर्वीच निधन झाले आहेत. निलेश अविवाहित होता. त्याच्या पश्‍चात आई चित्रकला, वृषाली, प्रणाली, तृप्तीमाला, सपना या चार बहिणी असा परिवार आहे.

निलेशकडे ३.३७ हेक्टर शेतजमीन होती. स्टेट बँकेचे चार लाख व अन्य एक लाख असे कर्ज त्याच्यावर होते. कर्जाच्या विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आत्महत्येची माहिती मिळताच तहसिलदार ज्योती देवरे, वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुहास राऊत व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. ह्याळीज कुटुंबियांचे सांत्वन केले. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Farmer committed suicide in Malegaon due to debt