दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

वणी (नाशिक) : मुलीच्या लग्नासाठी उसनवारीने घेतलेले पैसे कसे फेडायचे या विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिंडोरी तालुक्यातील शिंदवड भागात हा धक्कादाय प्रकार घडला. प्रकाश निवृत्ती बस्ते (वय 52) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बस्ते यांनी द्राक्षबागेच्या फवारणीसाठी आणलेले औषध पिऊन स्वतःचा जीव संपवला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसतांना बस्ते यांनी द्राक्षबागेच्या फवारणीचे विषारी औषध सेवन केले. काही वेळाने त्यांच्या पत्नी यांनी बस्ते यांना मोठ मोठ्याने खोकतांना पाहीले. पतीची स्थिती बघून घाबरुन जावून आरडाओरडा केली. यावेळी परीसरातील तात्काळ ग्रामस्थ मदतीला धावुन जावून प्रकाश बस्ते यांना खेडगाव येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपाचारानंतर त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच प्रकाश बस्ते यांना मृत घोषीत केले.

बस्ते यांची शिंदवड शिवारात 3 एकर शेती आहे. मागील काही काळात पिकाला भाव नसल्याने मुलीच्या लग्नाला उसनवारीने घेतलेले पैशे कसे फेडायचे या विवंचनेत होते. शेतात उभ्या पिकाला पाणी नाही त्यामुळे ते हतबल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा, आई, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार असुन एका मुलीचे मागील वर्षीच लग्न झाले असुन दुसऱ्या मुलीचे शिक्षण सुरु होते.

दिंडोरी सारख्या प्रगतशील तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिस व महसुल यंत्रणा ही निवडणूक सेवेत व्यस्त असल्याने प्राथमिक माहीती प्रशासनाने घेतली असली तरी याबाबत पंचनामा व मृत्यूची नोंद पोलिसांत झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com