धुळे : पावसाने घराचे छत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

Dhule
Dhule

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील जवखेडा गावात संततधार पावसाने घराचे छत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली. गुलाब लोटन पाटील (वय 55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

छत कोसळल्याची घटना सकाळी सहाला लक्षात आली. परिसरातील ग्रामस्थांनी ढिगारा उपसून पाहिल्यावर गुलाब पाटील यांचा मृतदेह आढळला. पाटील यांच्या पत्नी कल्पनाबाई यांना मेंदूविकार असल्याने त्या मुलासोबत उपचारासाठी नाशिक येथे गेल्या होत्या. छत कोसळण्याचा झोपेत अंदाज न आल्याने पाटील यांचा बळी गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली असे कुटुंब आहे.

गेल्या तीन दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मातीचे छत (धाबे) असलेली घरे पूर्णतः भिजली आहेत. छताचे वाढलेले वजन व कमकुवत झालेले लाकडी टेकू यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com