जिलेटीनच्या स्फोटात शेतकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

सिन्नर - सोनांबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीच्या बाजूला ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाला. स्फोटात एक शेतकरी ठार झाला. जिलेटीन कांड्यांच्या जवळ शेतकरी मोबाईलवर बोलत असल्याचा किंवा शेकोटी पेटवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही घटना आज सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली. बाळासाहेब पुंडलिक बोडके (वय 52) असे शेतकऱ्याचे आहे.

बाळासाहेब बोडके यांच्या शेतात विहीर खोदकाम सुरू होते. विहीर खोदण्याचे काम सुभाष दगडे यांना देण्यात आलेले होते. हे काम आठ दिवसांपासून सुरू होते. घटनास्थळी जिलेटीनच्या कांड्या पुरण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणाहून अवघ्या चार ते पाच फुटांवर विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी पाईप जोडणे बाकी होते. आज सकाळी बोडके शेतात गेले. त्यांनी प्लॅस्टिक पाइप जोडण्यासाठी शेकोटी पेटविल्याचा अंदाज आहे. शेकोटीमुळे जवळपासची जागा गरम झाल्याने जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाला असावा. यात शेतकरी बोडके जागीच मृत झाले. स्फोटाच्या आवाजाने पाच ते सहा किलोमीटरचा परिसर हादरला.

Web Title: Farmer death in gelatin blast