चाळीसगाव : उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

संजय वडार हे काल सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात सकाळपासून कामासाठी गेले होते. दुपारी साडेबाराला त्यांनी शेतातील पिकांना पाणी भरले. यावेळी वातावरणात प्रचंड उष्णता होती. काही वेळानंतर ते शेतातच बेशुद्ध पडले.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - जळगाव जिल्ह्यातील पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी संजय काळू वडार (वय 45) यांचा स्वतःच्या शेतात उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल (ता. 2) दुपारी चारच्या सुमारास घडली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

संजय वडार हे काल सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात सकाळपासून कामासाठी गेले होते. दुपारी साडेबाराला त्यांनी शेतातील पिकांना पाणी भरले. यावेळी वातावरणात प्रचंड उष्णता होती. काही वेळानंतर ते शेतातच बेशुद्ध पडले. सायंकाळी सहाच्या सुमारास शेजारच्या शेतकऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच, त्यांनी तातडीने त्यांना गावातील खासगी दवाखान्यात आणले. त्यानंतर चाळीसगावला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

सुरवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. मंदार करंबेळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा अंदाज आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच संजय वडार यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: farmer dies due to sunstroke in Chalisgaon