शेतकरी  कुटुंबाकडून आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 22 जुलै 2019

-  विहिरीसाठी अनुदानित मजुरी मिळत नसल्याने मोयाणे (जि. नंदुरबार) येथील शेतकरी कुटुंबाने आज विष प्राशनातून आत्महत्येचा प्रयत्न केला.

- या घटनेमुळे नंदुरबार आणि दोंडाईच्या पोलिसांचे धाबे दणाणले.

- त्यांच्याकडे वाहन नसल्याने पीडित कुटुंबाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी तासभर उशीर झाला. तोपर्यंत ते रस्त्यावर उलट्या करीत होते.

धुळे : विहिरीसाठी अनुदानित मजुरी मिळत नसल्याने मोयाणे (जि. नंदुरबार) येथील शेतकरी कुटुंबाने आज विष प्राशनातून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नंदुरबार आणि दोंडाईच्या पोलिसांचे धाबे दणाणले. त्यांच्याकडे वाहन नसल्याने पीडित कुटुंबाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी तासभर उशीर झाला. तोपर्यंत ते रस्त्यावर उलट्या करीत होते. त्यामुळे आजूबाजूला दुर्गंधी पसरली होती. 

मूळचे मालपूर (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील शेतकरी प्रकाश पोपट धनगर (वय 46) हे कुटुंबासह दहा वर्षांपासून शेतीसाठी मोयाणे येथे स्थायिक झाले आहेत. प्रकाश धनगर यांनी शासकीय योजनेतून शेतात विहिरीचे अठरा फूट खोदकाम केले. तरीही त्याची अनुदानित मजुरी यंत्रणेकडून दिली जात नव्हती.

या कारणावरून प्रकाश धनगर, योगिताबाई धनगर (43), भूषण धनगर (20), निखिल धनगर (18) यांनी आज सकाळी सव्वादहानंतर मोयाणे शिवारातील शेतीजवळ विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही माहिती नंदुरबार आणि दोंडाईच्या पोलिसांना कळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर पीडित धनगर कुटुंबाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

त्यांची प्रकृती स्थिर असून नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी एक जुलैला प्रकाश धनगर यांनी पत्नीसह अंगावर रॉकेल ओतून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A farmer family practiced sucide attempt