वीरगाव परिसरातील पाट दुरुस्ती झाल्याने शेतकऱ्यांत आनंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

वीरगाव - येथील कान्हेरी नदीतून पाटथळ क्षेत्रात पूरपाणी पोचविणाऱ्या पाटाची दुरुस्ती लघुपाटबंधारे विभागाकडून नुकतीच झाली. या कामाचे उद्‌घाटन माजी आमदार संजय चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कामासाठी आमदार दीपिका चव्हाण यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून दहा लाखांचा निधी मंजूर करून घेतल्यानंतर हे काम पूर्ण झाले आहे. लिकेज होणाऱ्या ठिकाणी सिमेंट पाइप टाकले असून, दुरुस्तीनंतर तत्काळ पाण्याचे आवर्तनही सोडले आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंद आहे. 

दसाणा धरणातून वीरगाव येथील थळ क्षेत्रासाठी रब्बीचे आवर्तन दर वर्षी दिले जाते. धरणातून पाणी कान्हेरी नदीत सोडल्यानंतर वीरगाव या गावानजीकच्या छोट्या पाटातून हे पाणी शेतीसाठी वापरले जाते. मात्र हा पाट नेहमी अनेक ठिकाणी लिकेज होत असल्याने परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वैतागला होता. अनेक शेतकरी वर्गांच्या शेतात पाटाचे पाणी पाझरत व फुटत असल्याने शेतकरी वर्गाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याबाबत शेतकरी वर्गाने लघुपाटबंधारे विभागाशी संपर्क साधून हा पाट दुरुस्त केला जावा, अशी विनंती केली होती. मात्र हा प्रश्‍न दूर होत नसल्याने शेतकरी वर्गाने आमदार चव्हाण यांची भेट घेऊन या कामासाठी निधी मिळवून देण्याची विनंती केली होती. 

आमदार चव्हाण यांनी या कामाच्या दुरुस्तीसाठी लघुपाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करून दहा लाखांचा निधी मंजूर करून घेतला. या निधीतून सिमेंट पाइपची खरेदी करून हे सर्व पाइप गळती होणाऱ्या ठिकाणी टाकले आहेत. या कामाच्या पूर्णत्वानंतर गेल्या दोन दिवसांपासून वीरगाव येथील पाटथळ क्षेत्रासाठी आरक्षित असलेले आवर्तन लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून सोडण्यात आले आहे. हे पाणी वीरगाव येथील सुकड नाल्यावरील बंधाऱ्यात पोचले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे. आगामी पावसाळ्यात या पाटाद्वारेच दसाणा धरणाचे पूरपाणी सटाणा शहरापर्यंत जाऊ शकणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. 

केळझर धरणातील वाहून जाणारे पूरपाणी उपचारीतून वीरगाव येथील बंधाऱ्यात सोडून वीरगावसहित आव्हाटी, भंडारपाडे, वनोली, तरसाळी या गावांचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार असल्यामुळे हा प्रस्ताव शासनदरबारी दाखल केला आहे 
-आमदार दीपिका चव्हाण, बागलाण 

Web Title: farmer happy viragaon area