युवा शेतकऱ्यांने केला मधमाशी पालनाचा प्रयोग

खंडू मोरे
सोमवार, 9 एप्रिल 2018

ग्रामीण जनतेचा सर्वांगिण विकास करणे व पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाच्या माध्यमातून पुरक व्यवसायाची निवड केली.शासनाने या व्यवसायासोबतच मधाशी संबंधित उद्योग धंद्यामध्ये वाढीसाठी सहकार्य केल्यास पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळतील.
- राहुल जाधव, पिळकोस

खामखेडा (नाशिक) : सध्या नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय हातभट्ट्याचा व्यवसाय ठरू पहात आहे. नैसर्गिक संकटांपुढे शेती करण जिकरीचे ठरल असतांना कसमादे भागातील अनेक शेतकरी सध्या दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट पालन यासह विविध शेती पूरक व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र पिळकोस ता कळवण येथील युवा शेतकरी राहुल जाधव यांनी मधमाशी पालन करून शेतीला पूरक व्यवसाय सुरु केला असून त्यांच्या मधमाशी पालनाच्या व्यवसायाला पंचक्रोशीतील शेतकरी भेट देत असून सध्या सर्वत्र या प्रयोगाचीच चर्चा सुरु आहे.

फक्त शेती करून उत्पन्न वाढविता येत नाही.तर पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड तसेच पूरक व्यवसायाची जोड देन गरजेच भासू लागले आहे.या गरजेतून अनेक प्रयोग शेतीत सध्या सुरू आहेत.त्यातलाच एक व्यवसाय म्हणजे मधुमक्षिका पालन होय.

मधमाश्या पालनातून पिळकोस येथील राहुल जाधव या युवा शेतकर्याने शेतीला पूरक उद्योग म्हणून हा प्रयत्न सुरु केला आहे. पुणे येथिल खादी ग्रामउद्योग केंद्रातून मधमाशी पालन व्यवसायाचे ५ दिवसांचे प्रशिक्षण घेतले.प्रशिक्षणानंतर या प्रशिक्षणार्थी शेतकर्यांना प्रायोगिक तत्वावर खादी ग्रामउद्योगावाकडून अल्प दरात मधमाशांच्या २० पेट्या मिळाल्या आहेत. यात मेली फेरा माशी जातीच्या मधमाश्या आहेत.

या एका पेटीत १० फ्रेम तयार होतात.फ्रेममध्ये एक एक करून मधमाशा शिरतात व मध जमा करतात.या मधमाशांमध्ये एक राणी माशी राहते. या माशा रोज दिवभर एक-दीड किलोमीटर फिरून परागकण व मकरंद जमा करतात.या मधमाशा पिकांना अधिक उपयुक्त असून त्यातून पिकांसाठी  फायदेशीर ठरत आहेत.

सरासरी एका महिन्याला एका पेटीपासून 5 किलो मध तयार होत आहे.तयार झालेले मध शेतक-यांकडून खादी ग्रामउद्योग पुणे २५०ते ३०० किलोने तर वतयार झालेले मेण ७०० रुपये किलो दराने खरेदी करणार आहेत.शेतीबरोबर हमखास उत्त्पन्न देणाऱ्या ह्या शेतीपूरक व्यवसायास ह्या भागातील शेतकरी भेट देत आहेत.

ग्रामीण जनतेचा सर्वांगिण विकास करणे व पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाच्या माध्यमातून पुरक व्यवसायाची निवड केली.शासनाने या व्यवसायासोबतच मधाशी संबंधित उद्योग धंद्यामध्ये वाढीसाठी सहकार्य केल्यास पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळतील.
- राहुल जाधव, पिळकोस

Web Title: farmer success story