#TuesdayMotivation : लहरी निसर्गावर केली मात..चक्क पिकविला 'इतका' मका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

लष्करी अळीमुळे होणारे नुकसान बघून बऱ्याच शेतकऱ्यांनी धीर सोडला. काहींनी मकापिकामध्ये नांगरणी करून टाकली, तर काही शेतकऱ्यांनी पीक सोडून दिले. उत्पादनापेक्षा खर्च वाढू लागला होता. अशा परिस्थितीमध्ये कोकणगाव येथील शेतकरी माणिक सरोदे यांनी एक एकरमध्ये ४७ क्विंटल यशस्वी मका उत्पादन घेतले. त्यामुळे परिसरातील शेतकरी सरोदे यांच्या मक्‍याचे पीक पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. 

नाशिक : यंदाच्या हंगामात मकापिकाबद्दल सगळीकडे चर्चा होती ती लष्करी अळीची. शेतकऱ्यांनी अनेक उपाय करून मका जपल्याचे उदाहरण म्हणजे माणिकराव हरिभाऊ सरोदे यांचे. मकापिकाचे त्यांनी ४७ क्विंटल यशस्वी उत्पादन घेतले. लष्करी अळीमुळे होणारे नुकसान बघून बऱ्याच शेतकऱ्यांनी धीर सोडला. काहींनी मकापिकामध्ये नांगरणी करून टाकली, तर काही शेतकऱ्यांनी पीक सोडून दिले. उत्पादनापेक्षा खर्च वाढू लागला होता. अशा परिस्थितीमध्ये कोकणगाव येथील शेतकरी माणिक सरोदे यांनी एक एकरमध्ये ४७ क्विंटल यशस्वी मका उत्पादन घेतले. त्यामुळे परिसरातील शेतकरी सरोदे यांच्या मक्‍याचे पीक पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. 

Image may contain: one or more people, crowd and outdoor

लष्करी अळी, अतिवृष्टीवर जिद्दी शेतकरी सरोदे यांनी दाखविला आशेचा किरण 
कोकणगाव, शिरसगाव, साकोरे या परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका सीड्‌स कंपनीचे संजय जाधव, सागर निकुंभ, सागर परदेशी यांनी शेतकऱ्यांना मकापिकाविषयी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित शेतकरी हरिभाऊ सरोदे, माणिक सरोदे, केशव मोरे, वाळू मोरे, गोविंद गायकवाड, विजय लोकनार, शरद गायकवाड, विश्‍वास मोरे, देवराम लोकनार, नितीन पठाडे, वामन मोरे, संपत वलवे, प्रशांत मोरे, मुरलीधर भडांगे, जयराम मोरे, बाळासाहेब मोरे, अजित सय्यद, अनिल जाधव, ठका भडांगे आदी उपस्थित होते. या वेळी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी खते, औषधे, पाणी व्यवस्थापन यांचे काटेकोरपणे नियोजन कसे केले याची माहिती सरोदे यांनी शेतकऱ्यांना दिली. एका एकरात त्यांनी केलेल्या पेरणीला 18-46-00 यूरिया खताची मात्रा दिली. कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशकांची फवारणी केली. सरी पाडून पुन्हा 10-26-26 खत दिले. योग्य पाणी दिल्याने मक्‍याचे पीक डोलात उभे राहिले. चार महिन्यांनंतर काढणीसाठी घेतले असता दमदार कणीस हाती आले. 

Image may contain: one or more people, flower and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer successfully harvested 47 quintals of corn crop at Nashik