तरुण शेतकऱ्याची मेहुणबारेत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - येथील 31 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - येथील 31 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली.

गावातील चार क्रमांक गल्लीतील रहिवासी शिवाजी अभिमान गढरी (वय 31) हे गेल्या काही दिवसांपासून कर्जामुळे व्यथित होते. शेती त्यांना परवडत नसल्याने रिकाम्या वेळेत ते गाडी चालवायचे. अशातच सुमारे अकरा महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. शिवाजी गढरी हे काही दिवसांपासून पारोळा येथे आपल्या साडूकडे रोजगारासाठी गेले होते. तेथेही पाहिजे तसा रोजगार उपलब्ध न झाल्याने मुलाला पारोळा येथे टाकून ते गावी आले होते. आज सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी त्यांना जेवणाचे विचारण्यास गेली असता, शिवाजी गढरी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मेहुणबारे पोलिसांना कळविल्यानंतर हवालदार दीपक पाटील व सचिन वाघ यांनी पंचनामा केला. चाळीसगावच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी शवविच्छेदन केले. शिवाजी गढरी यांच्यावर सायंकाळी चारला अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश गढरी यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: farmer suicide

टॅग्स