चांदोरा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

तालुक्यातील चांदोरा येथील तीस वर्षीय तरुण शेतकऱयाने सततची नापिकी, बहिणीच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून केलेली हात उसनवारी व घरातील वृद्ध आईच्या आजारपणामुळे नैराश्य आल्यामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली.  

नांदगाव : तालुक्यातील चांदोरा येथील तीस वर्षीय तरुण शेतकऱयाने सततची नापिकी, बहिणीच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून केलेली हात उसनवारी व घरातील वृद्ध आईच्या आजारपणामुळे नैराश्य आल्यामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली.  

गेल्या रविवारी भारत अमृत उर्फ बाबासाहेब पवार वय ३०  याने विष प्रश्न केले होते. त्याला उपचारांसाठी नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याची नाजूक अवस्था बघून पुढील उपचारांसाठी मालेगावच्या शासकीय रग्णालायत हलविले होते. मात्र, पुन्हा त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने मालेगावच्याच खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. गावाच्या कामगार तलाठ्याने पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदारांना सादर केला आहे 

Web Title: farmer suicide in Chandora