डांभूर्णीला शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

डांभूर्णी (ता. यावल) - येथील पंडितनगरात रहिवासी मिलिंद ऊर्फ समाधान भिवसन सोनवणे (वय २७) या तरुण शेतकऱ्याने दारूच्या नशेत गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेनऊला उघडकीस आली. 

डांभुर्णी (ता. यावल) येथील समाधान सोनवणे हा शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. घरची परिस्थिती बिकट असून त्याच्यावर एक ते दीड लाख रुपयांचे कर्ज झाले होते. कर्जबाजारीपणामुळे समाधान हा दिवसेंदिवस दारूच्या आहारी गेला होता व घरातील सदस्यांना मारहाण करीत होता. वारंवार मी शेत विकून टाकीन, मी आत्महत्या करीन, अशा धमक्‍याही देत होता, असे त्याच्या आईने सांगितले.

काल (ता. ३०) सायंकाळी तो दारूच्या नशेत असताना आई, पत्नी व मुलांना मारहाण करू लागला. त्यामुळे सुनेला व नातवंडांना सासूने माहेरी (अट्रावल) येथे पाठवून दिले. स्वतः शेजाऱ्यांच्या घरात रात्र काढली. आईने सकाळी घरी येऊन दरवाजा उघडला असता मुलगा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. तिने टाहो फोडताच आजूबाजूच्या लोकांनी एकच गर्दी केली. समाधान याच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे.

या घटनेची फिर्याद गावातील पोलिस पाटील हेमराज सावळे व मयताचा मामा दिलीप अडकमोल यांनी दिली. पोलिस निरीक्षक  बळिराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र साळी व पोलिस कॉन्स्टेबल विकास सोनवणे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. रवींद्र साळी तपास करीत आहेत.

दारूबंदीसाठी महिलांचा उद्रेक
घरातील तरुण मुलाचा दारूच्या नशेत मृत्यू झाल्याने संसार उघड्यावर आला. अशी घटना दुसऱ्या ठिकाणी घडू नये म्हणून दारू बंदी करावी व अधिकारी वर्गांनी, पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, असा आक्रोश महिलांनी केला. डांभुर्णीसह उंटावद, कोळन्हावी, चिंचोली येथे दारू बंदी असून डोणगावमध्ये दारूची सर्रास विक्री होत आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: farmer suicide in dambhurni