आंबीखालसाच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

तळेगाव दिघे : संगमनेर ( जि. नगर ) तालुक्यातील आंबीखालसा येथील संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी ( ता.३ जून ) सकाळी पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गा लगतच्या रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.(

१ जून पासून शेतकरयांनी संपाचे हत्यार उपसले आहे. ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर दुध व भाजीपाला टाकून सरकारचा निषेध करीत आहेत. रविवारी सकाळी आंबीखालसा परिसरातील शेतकरी सरकारचा निषेध करण्यासाठी महामार्गानजीक एकत्र आले होते. रस्त्यावर दुध ओतण्यासाठी मोठया प्रमाणात दुधही आणले होते. प्रसंगी तुळशिनाथ भोर, सुरेश गाडेकर, अशोक गाडेकर, अरूण कान्होरे, बाळासाहेब ढोले, दिपक ढमढेरे, सर्जेराव ढमढेरे, नितीन काशीद, निवृत्ती कहाणे, रईस शेख उपस्थित होते.

Web Title: the farmers of ambikhalasa poured milk on the road