शेतकरी व मजूरांची उन्हाच्या झळा अंगावर झेलत कांदा काढणी सुरु

रोशन भामरे
बुधवार, 28 मार्च 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयात तापमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाचा पारा चाळीशीच्या आसपास गेल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. कडक उन्हाच्या झळा अंगावर लाही-लाही होत असतानाही बागलाण तालुक्यात कांदा काढणीची कामे चालू आहेत.

तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयात तापमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाचा पारा चाळीशीच्या आसपास गेल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. कडक उन्हाच्या झळा अंगावर लाही-लाही होत असतानाही बागलाण तालुक्यात कांदा काढणीची कामे चालू आहेत.

रणरणत्या उन्हाचा चटका गेला दहा-बरा दिवसापासून चांगलाच जाणवत असून,रात्रीच्या वेळेस थंडी,दिवसा कडक उन्हाचा चटका या वातावरणातील उकाडा चांगलाच जाणवत आहे. तळवाडे दिगर, मोरकुरे, पठावे, डांगसौदाणे, जोरण, किकवारी, निकवेल, कंधाणें, विंचुरे आदी गावांच्या परिसरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरु असून,चालू वर्षी नदी,नाले,विहिरी,कुपनलिका यांनी पाणी बऱ्यापैकी असल्यामुळे परिसरात चालू वर्षी कांद्याचे लागवड क्षेत्रात वाढ झाली होती तसेच चालू वर्षी कांद्यासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे दरवर्षीच्या  तुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट झाली आहे.एकीकडे नागरिकांना उन्हामुळे घराच्या बाहेर न निघण्याचे सागितले जातेय तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी व मजूर वर्ग उन्हाच्या झळा अंगावार सोसत कष्ट करताना दिसतोय.

दुपारच्या वेळेस कडक उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून,तापलेली जमीन व त्यातून निघणाऱ्या तप्त झळा शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषाच्या अंगावर चांगलेच चटके देऊन जात आहेत.काढणीस आलेले कांदा पिक उन्हाच्या चटकक्याने भाजू न्हाये म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्यापाचटाचा वापर करीत असताना दिसत आहेत तर काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेचच चाळीत भरण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे चित्र दिसत आहे.

उन्हाच्या चटक्याने शेतातील पिके हि पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहेत,दिवसभर काम करताना स्वसंरक्षणासाठी अंग झाकून घ्यावे लागत आहे.म्हणून संरक्षणासाठी  मजूर वर्ग टोप्या उपरण्याचा वापर करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
 
1. सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्यांनी घट
चालू वर्षी सुरुवातीलाच खराब वातावरणामुळे कांद्याचे रोपे खराब झाली व परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा लागवड उशिरा करावी लागली दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणारी लागवड चालू वर्षी जानेवारी संपे पर्यंत चालली त्यातच भर म्हणजे संपूर्ण हंगामात दर दहा-पंधरा दिवसातात सतत बदलणारे हवामानामुळे त्यामुळे चालू उशिरा लागवड केलेल्या कांद्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून परिणामी सरसरी उत्पन्नात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

2. बाजारभाव नसल्याने साठवणुकीवर भर
  बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादक घेतले जाते.व कांदा हे पिक शेतकऱ्याच्या अर्थकारणात महतवाची भूमिका बजावणारे पिक असल्याने त्याच्या बाजारभावावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलबून असतात.कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते कांदा कांदा लागवड,खुरपणी, औषध फवारणी,काढणी ,भरणी आदीपासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची भांडवली गुंतवणूक होते.त्यातच समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही तर भांडवलही सुटत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कांद्याला हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून केली जात आहे.

Web Title: Farmers and laborers started onion harvesting in the summer