"शेतक-यांना वाचवायचे तर कर्जमाफी द्या".. युवा शेतकऱ्यांची आदित्य ठाकरेंकडे मागणी 

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 4 November 2019

आदित्य ठाकरे हे पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागेची पाहणी करण्यासाठी आले होते.यावेळी युवा शेतकरी दीपक रघुनाथ दांडेकर यांनी नुकसानीची माहिती ठाकरे यांना देत कर्जमाफीशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. यावर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत नुकसान झालेल्या बागेची पाहणी केली.

नाशिक : "आदित्य साहेब आम्हाला वाचवायचं असेल तर संपूर्ण कर्जमाफी द्या" अशी मागणी वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांनी युवा सेनेचे प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे हे पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागेची पाहणी करण्यासाठी आले होते.यावेळी युवा शेतकरी दीपक रघुनाथ दांडेकर यांनी नुकसानीची माहिती ठाकरे यांना देत कर्जमाफीशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

Image may contain: 9 people, people standing

यावर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत नुकसान झालेल्या बागेची पाहणी केली. दौऱ्यात शिवसेना विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, आ.नरेंद्र दराडे,सुहास कांदे, माजी आ.अनिल कदम, शिवसेना तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे सहभागी झाले होते.

युवा शेतकऱ्यांची आदित्य ठाकरेंकडे मागणी 

Image may contain: 8 people
काय म्हणाले आदित्य ठाकरे......

दाभाडीत शेतकरींशी संवाद साधतांना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बोलत होते की, शिवसेना  शेतकरींसोबत आहे. शेतक-यांवर आलेले हे संकट मोठे असून ओला दुष्काळ जाहिर झाला पाहिजे. पंचनामे वेगाने होवून सर्वांना मदत मिळाली पाहिजे. काही बरे वाईट करण्याचा विचार करू नका, मला हाक मारा. शिवसेना तुमच्यासाठी सदैव आहे. विमा कंपनी व अन्य कोणी शेतकरी बांधवांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गाठ आमच्याशी आहे. नुकसान भरपाई कर्जमाफीसाठी कटीबध्द असून केंद्राने भरीव मदत करायला हवी.

Image may contain: 12 people, including Pradip Kapadne, Sanjay Palaskar, Dnyaneshwar Chavan and Vilas Joshi, outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers demanding Debt forgiveness to Aditya Thakre