वर्ष उलटले.. तरीही 'इथले' शेतकरी पेन्शनपासून वंचित 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान पेन्शन योजना गतवर्षापासून लागू केली आहे. दर वर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची पेन्शन देण्याची योजना केंद्र शासनाने अंमलात आणली आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचे सात-बारा, आधारकार्ड आणि बॅंकेचे खाते नंबर ऑनलाइन करण्याचे काम तलाठ्यांकडे सोपविले होते. पण ते काम काळजीपूर्वक न केल्याने अनेक शेतकऱ्यांची पेन्शन योजनेची कागदपत्रे ऑनलाइन न झाल्याने येथील तब्बल 300 शेतकरी वर्ष होऊनही या योजनेपासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. बॅंकेत चकरा मारून कंटाळल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी "सकाळ'ला दिल्या आहेत.

नाशिक : पंतप्रधान किसान योजना लागू होऊन वर्ष उलटले तरीही गिलाणे येथील शेकडो शेतकरी या पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पेन्शन योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. या संदर्भात येथील तलाठी चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

काही शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा एकही हप्ता नाही

राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान पेन्शन योजना गतवर्षापासून लागू केली आहे. दर वर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची पेन्शन देण्याची योजना केंद्र शासनाने अंमलात आणली आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचे सात-बारा, आधारकार्ड आणि बॅंकेचे खाते नंबर ऑनलाइन करण्याचे काम तलाठ्यांकडे सोपविले होते. पण ते काम काळजीपूर्वक न केल्याने अनेक शेतकऱ्यांची पेन्शन योजनेची कागदपत्रे ऑनलाइन न झाल्याने येथील तब्बल 300 शेतकरी वर्ष होऊनही या योजनेपासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. बॅंकेत चकरा मारून कंटाळल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी "सकाळ'ला दिल्या आहेत. 

कागदपत्रे ऑनलाइन अपडेट न झाल्याने शेतकऱ्यांत तीव्र संताप 
पंतप्रधान किसान योजनेचा सर्व्हे करण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची माहिती व्यवस्थित ऑनलाइन न केल्यामुळेच येथील तीनशे शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. दरम्यान, तलाठी चव्हाण यांच्याकडे येथील अतिरिक्त कार्यभार असून, आठवड्यात एकच दिवस ते गावात थांबत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. पूर्णवेळ तलाठी नेमून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी येथील संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers don,t get pension at Gilane Nashik Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: