कावळे यांच्यासारख्या जलयोध्यामुळेच शेतकऱ्यांना मिळाले हक्काचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

ओझर - पाणीवापर संस्थेचे जनक, समाजपरिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत कावळे हे एक जलयोद्धा होते. त्यांच्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले. पाण्याचा वापर किती काळजीपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने कसा केला पाहिजे, याची शिकवण त्यांनी दिली, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी आज या जलयोध्याला सलाम केला. येथील माळी मंगल कार्यालयात झालेल्या शोकसभेत राज्यभरातून आलेल्या विविध मान्यवरांनी कावळे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कुमार औरंगाबादकर यांनी त्यांचा जीवनपट उलगडून सांगितला. राज्याचे माजी मंत्री भाई वैद्य, आमदार अनिल कदम, जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे, सुभाष लोमटे, गोपाळ पाटील आदींनी कावळे यांच्या कार्याचा गौरव केला. "पाण्याच्या बाबतीत कावळे हे योगी व कर्मनिष्ठ होते; तर समन्यायी पाणीवाटपात त्यांची हातोटी होती. त्यांच्यामुळेच आज राज्यातल्या पाणीवापर संस्था यशस्वी झाल्याचे वैद्य यांनी सांगितले.
Web Title: Farmers get right water