शेतकऱ्यांनी गिरविला वाईन निर्मितीचा धडा...

शेतकऱ्यांनी गिरविला वाईन निर्मितीचा धडा...
शेतकऱ्यांनी गिरविला वाईन निर्मितीचा धडा...

गोदा काठची रम्य सकाळ... अन्‌ द्राक्ष पंढरीत ..शनिवारपासुन फलोत्पादन महापरिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन दाखल झालेल्या बळिराजांची कृषी प्रक्रिया उद्योगांना भेट घडवून आणण्यात आली होती. त्यामध्ये सुला विनियार्डेला भेट देण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन बस गोदावरीच्या काठाकाठाने निघाली.. तशी शेतकऱ्यांची आपापसात चर्चा रंगू लागली द्राक्षांपासुन वाईन कशी बनवतात, त्यासाठी कोणती द्राक्षे लागतात, रेड वाईन व व्हाईट वाईन यात नेमका काय फरक आहे. अशी एक ना अनेक प्रश्‍नांची मनातल्या मनात गर्दी होत असतांना बस पुढे पुढे जात होती. वाईन निर्मितीचे कुतुहल व उत्सुकता बाळगत शेतकऱ्याची बस कधी गोवर्धन गावालगत असलेल्या सुला विनियार्डच्या प्रांगणात दाखल झाली हे कळलेही नाही. शेतकऱ्यांनी जेव्हा सुला विनियार्डच्या परिसरात पाउल ठेवले तेव्हा सकाळचे बरोबर आठ वाजले होते. सुला विनियार्डचा तीस एकराचा नयनरम्य परिसर....तेथे वायनरी साठी असलेले द्राक्षांचे मळे अन्‌... द्राक्षांपासुन सुला वाईनच्या निर्मितीची एक एक टप्पे प्रत्येक शेतकऱ्यांनी मन लावून समजुन घेतले. इतक्‍या दिवस द्राक्षांपासुन वाईन बनते हे फक्त ऐकले होते. मात्र आज सकाळ माध्यम समुहच्या फलोत्पादन महापरिषदेच्या निमित्ताने सर्वसामान्य शेतकऱ्यांना द्राक्षांपासुन वाईन निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव याची देही याची डोळा घेता आला.....शिवाय काही बळिराजांना रेड व व्हाईटची चव देखिल चाखण्याची संधी मिळाली. आज भेट दिलेल्या सुला विनियार्ड हे कृषी मालावर प्रक्रिया करुन त्याचे उत्पन्नात रुपांतर कसे करावे याचे उत्तम उदाहरण असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. कारण येथे द्राक्षावर प्रक्रिया करुन त्यापासून विविध चव असलेली वाईन बनविली जाते. भारतासह विविध 24 देशांना वाईनची निर्यात केली जाते व द्राक्षापासुन वाईन बनविल्यानंतर उरलेल्या मालावर देखील प्रक्रिया करून त्यापासुन गेपसिड तेल, चोथ्यापासुन बिस्किट असे सर्वच तयार करता येतात. हे जाणून शेतकरी आनंदीत झाले. सुला विनियार्डे ही भेट म्हणजे नावीन्याचा एक विलक्षण अनुभव पदरी घेत शेतकरी बांधव आनंदीत होऊन निघाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे चैतन्य झळकत होते.

आज फलोत्पादन परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याना शेतीत आधुनिक प्रयोगशीलतेला वाव देण्यासाठी सुला विनियार्डेला प्रत्यक्ष भेट देत द्राक्ष मन्यांपासुन वाईन निर्मितीची माहिती घेतली. त्यात प्रामुख्याने रेड व व्हाईट वाईनबरोबर इतर तीस प्रकारच्या वाईन्स कशा बनवितात याचे टप्पे जाणून घेतले. त्यामध्ये ब्रशिंग पॅन-न्युमाटिक ब्लुन पेस्ट मशिन, स्टेनर मशिन-साल व द्राक्ष मणी अलग करण्यासाठी, टॅंक हॉल-तापमान नियंत्रित करण्यासाठी, बॅरल रुम-वाईनची साठवण अमेरिकन व फ्रेंच ओक लाकडापासुन बनलेल्या बॅरलमध्ये करतात व वाईनसाठी लागणारी द्राक्षाची प्रत्यक्ष शेतात जावून माहिती घेतली. शिवाय द्राक्ष पिकाचे संर्वधन कसे करावे, पाण्याचे नियोजन, जागतिक बाजारपेठेत मार्केटिंग करण्याचे तंत्रही शेतकऱ्यांनी जाणून घेतले. शिवाय वाईन कशी साठविली जाते, जागतिक बाजारपेठेत वाईनची किमंत कशी ठरवतात, कोणती वाईन बनविण्यासाठी किती कालावधी लागतो यासह शेतकऱ्यांनी आपल्या अनेक शंकाचे निरसन करून घेतले. सुला विनियार्डेच्या वतीने मुख्य व्यवस्थापक नाना शेळके, रमण भोयर यांनी संयोजन व शेतकऱ्यांचे स्वागत केले. तर योगेश शिंदे व विशाल मोरे यांनी द्राक्ष मन्यांपासुन वाईन निर्मिेतीची प्रक्रिया समजुन सांगितली.

प्रत्यक्ष प्रकल्पाची भेट घेऊन नवीन गोष्टी समजल्याने काहीतरी गवसल्याचा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com